हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला ग्रामीण भागामध्ये शेतीआधारित व्यवसायांना (Dung Tiles Business) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक सुशिक्षित तरुण किंवा काही शेतकरी देखील शेतीला जोडून एखादा व्यवसाय करण्याच्या तयारीत असतात. मात्र, माहितीअभावी अनेक जण त्याकडे वळत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला गाय-म्हशीच्या शेणापासून बक्कळ कमाई करून देणाऱ्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. विशेष सध्या शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील सिमेंट, फरशी यांच्या माध्यमातून घरे आणि बंगले बांधले जात आहे. परिणामी, घरे बांधणे ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार असल्याने, या शेणापासून फरशी बनवण्याचा व्यवसायाला (Dung Tiles Business) चांगली झळाळी मिळू शकते.
बाजारात मोठी मागणी (Dung Tiles Business Idea)
2010 च्या दशकापर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मातीची घरे पाहायला मिळत होती. मात्र, सध्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील टाईल्स अर्थात फरशीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इतकेच नाही शहरी भागामध्ये पेव्हर ब्लॉकला देखील खूप मागणी असते. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेण उपलब्ध असते. काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. असे शेतकरी तर शेणखताची देखील विक्री करतात. मात्र, आता तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल. तर गाई म्हशींच्या शेणापासून फरशी बनवण्याचा व्यवसाय (Dung Tiles Business) तुम्ही सुरु करू शकतात. ज्यासाठी तुम्ही गरज पडल्यास इतर शेतकऱ्यांकडून कच्चा माल म्हणून शेणाची खरेदी देखील करू शकतात.
किती येतो खर्च?
साधारणपणे शेणापासून एक वर्ग फुटाची एक फरशी बनवण्यासाठी 15 ते 20 रुपये इतका खर्च येतो. शेणापासून फरशी बनवण्याचा व्यवसाय (Dung Tiles Business) सुरु करायचा असेल तर तुमच्याकडे आपली स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी तुम्ही शेण वाळवू शकतात. याशिवाय तुम्हाला वाळलेल्या शेणाचा चुरा करण्यासाठी एक मशीन घ्यावी लागणार आहे. अर्थात तुम्हाला या व्यवसाय सुरु करण्यासाठी कमीत कमी एकूण 50 हजार ते 1 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो.
फरशी तयार कशी करतात?
फरशी तयार करताना सर्वप्रथम गाय किंवा म्हशींचे शेण दोन दिवस वाळवले जाते. त्यानंतर वाळलेले शेण मशीनमध्ये बारीक केले जाते. त्यानंतर शेणाच्या चुऱ्यामध्ये झाडांच्या मुळ्यांचा चूर, निलगिरी आणि अन्य झाडांची पाने बारीक करून टाकली जातात. ज्यामुळे शुद्ध हवा आणि थंड वातावरणासाठी मदत होते. यासाठी तुम्ही अनेक झाडांच्या थंडावा निर्माण करणाऱ्या झाडांच्या मुळ्यांचा चूर वापरू शकतात. पाणी टाकून हे शेणाचे मिश्रण एकत्रित तयार करून घेतले जाते. त्यानंतर ते गरजेनुसार साच्यांमध्ये टाकून फरशी बनविली जाते. सुकल्यानंतर तिला आकर्षक रंग दिला जातो.
शेणाच्या फरशीची वैशिष्ट्ये
शेणापासून बनवलेल्या फरशीचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ही फरशी घरातील वातावरण थंड ठेवण्यास मदत करते. म्हणूनच ग्रामीण भागामध्ये पूर्वावार शेणाने सारवलेली घरे असायची. याच धर्तीवर सध्या शेणाच्या बनवलेल्या फरशांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या फरशीमुळे घरात शुद्ध आणि थंड हवा मिळते. अशा फरशींमुळे उन्हाळयाच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेच्या प्रकोपापासून वाचण्यास मदत होते. त्यामुळे हा व्यवसाय सुरु केल्यास मोठी कमाई होऊ शकते