Success Story : 5 एकरात स्ट्रॉबेरी लागवड; डॉक्टर शेतकऱ्याची शेतीतून लाखोंची कमाई!

Success Story 5 Acres Of Strawberry Earn Millions
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाकडे (Success Story) मोठ्या प्रमाणात वळत आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असले तरी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेताना शेतकरी दिसून येत आहे. विशेष म्हणजे थेट विक्रीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे आपल्या 5 एकर शेतीतुन लाखोंची कमाई करत आहे. विशेष म्हणजे ते डॉक्टर असून, त्यांनी शेतीची आवड म्हणून आधुनिक पद्धतीने (Success Story) स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

सप्टेंबर महिन्यात लागवड (Success Story 5 Acres Of Strawberry Farming)

डॉ विकास अग्रवाल असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते छत्तीसगड राज्यातील रामानुजगंज जिल्ह्याचे रहिवासी आहे. शेतकरी विकास अग्रवाल (Success Story) हे पेशाने डॉक्टर असून, त्यांनी आपल्या 5 एकर शेतात स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. यासाठी त्यांनी आधुनिक पद्धतीने ड्रीप सिंचन पद्धती आणि मल्चिंग पेपरद्वारे लागवड केली आहे. डॉ विकास अग्रवाल सांगतात, आपण डॉक्टर असलो तरी लहानपणापासून आपल्याला शेतीची आवड असल्याने आपली आपण शेतीकडे वळलो. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपण स्ट्रॉबेरीची केली होती. ज्यातून डिसेंबर महिन्यात आपल्याला उत्पादन मिळण्यास सुरुवात झाले होते.

किती मिळाले उत्पन्न?

डॉ विकास अग्रवाल सांगतात, आपल्याला बाजारात सध्या स्ट्रॉबेरीला 250-300 रुपये प्रति किलोचा दर (Success Story) मिळत आहे. आपण एका एकरात 22 हजार रोपे लावली आहेत. साधारणपणे पहिली दोन महिने आपल्याला पाच एकरात दररोज 200 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळाले. तर त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून आपल्याला दररोज 600 किलोग्रॅम स्ट्रॉबेरी उत्पादन मिळत आहे. ज्यास संपूर्ण हंगामात 250-300 रुपये किलोचा दर मिळाला आहे. अर्थात संपूर्ण चार महिन्यात आपल्याला एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कुठे करतात विक्री?

डॉ विकास अग्रवाल सांगतात, स्ट्रॉबेरीला मोठ्या शहरांमध्ये खूप मागणी आहे. देशात पारंपरिक शेतीऐवजी सध्या अनेक लोक फळबाग शेती करण्याकडे आपला कल वळवत आहे. आपणही शहरातील नागरिकांची गरज पाहता स्ट्रॉबेरीची पिकाचे उत्पादन घेण्याचे निश्चित केले. त्यामुळे स्ट्रॉबेरीची विक्री करताना शेतकऱ्यांनी एक निश्चित योजना बनवली. तर शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो. आपणही रामानुजगंज येथून कोलकाता, बिलासपुर, रायपुर, रायगड, कोरबा आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये स्ट्रॉबेरी पाठवतो. शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या माध्यमातून शेती आपली आर्थिक स्थिती सुधारावी, असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.