तौत्केनंतर ‘Yaas’ चक्रीवादळाचं अस्मानी संकट; या राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट

Heavy Rainfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळाचा धोका संपतो न संपतो अजूनही त्यातुन देश सावरत असताना आता आणखी एका नवीन चक्रीवादळाचा धोका देशासमोर घोंगावत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांना जबरदस्त बसलाय अद्यापही या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. तोच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून पुढील काही दिवसात या कमी दाबाच्या पट्ट्याचा रूपांतर चक्रीवादळात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तौत्केनंतर ‘Yaas’ चक्रीवादळाचं अस्मानी संकट; या राज्यांमध्ये हाय अ‍लर्ट अंतर बंगालच्या खाडीत व उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहेत. परिणामी या कमी दाबाच्या पट्ट्याचा 23 आणि 24 मे रोजी वादळात रूपांतर होणार असून आता या वादळाचे नामकरणही करण्यात आले असून ओमानने या वादळाला ‘यस'(Yaas’ ) असं नाव दिले आहे. या वादळाचा देशाच्या दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीला सर्वात जास्त धोका आहे. पण हे वादळ आपल्या पट्ट्यात आल्यानंतर अधिक ठोस भाष्य करता येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या तज्ञांकडून देण्यात आली आहे

कोणत्या राज्यांना धोका

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 23 आणि 24 रोजी संभाव्य वादळ निर्माण होणार आहे या वादळाचा सर्वाधिक फटका अंदमान निकोबार बेटांना, ओडिसा आणि पश्चिम बंगालला बसणार आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी 140 ते 150 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.