Farming Techniques : शेतकऱ्याची कमाल; कलम पद्धतीने एकाच झाडाला उगवलेत टोमॅटो-वांगी!

Farming Techniques Tomato-Brinjal In One Plant
xr:d:DAF6N11hWmk:2147,j:8812842379111318657,t:24040411
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे (Farming Techniques) उत्पादन घेतात. विविध हंगामात शेतकरी विविध प्रकारची भाजीपाला पिके घेताना दिसून येतात. विशेष म्हणजे बाजारात भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न देखील मिळते. मात्र, आता एका शेतकऱ्याने एकाच झाडावर टोमॅटो आणि वांग्याचे उत्पादन घेतल्याचे समोर आले आहे. कलम पद्धतीने एका झाडावर वांगी आणि टोमॅटो लगडल्याने, या शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक (Farming Techniques) केले जात आहे.

प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख (Farming Techniques Tomato-Brinjal In One Plant)

देवेंद्र दवंडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्याचे रहिवासी आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेले देवेंद्र हे यु-ट्यूबवर बघत बघत नवनवीन शेतीमध्ये प्रयोग (Farming Techniques) करत असतात. त्यातूनच त्यांनी कलम करण्याची प्रशिक्षण घेतले आहे. ज्यामुळे त्यांनी यु-ट्यूबवर पाहून तामिळनाडू येथून ‘टर्की बेरी’ या झुडूप आणि काटेरी स्वरूपात असलेल्या बारमाही वनस्पतीची काही रोपे मागवली. ज्यावर देवेंद्र दवंडे यांनी टोमॅटो आणि वांग्याचे झाड कलम केले. तीन महिन्यापूर्वी त्यांनी ही झाडे कलम होती. सध्या त्यांच्या या झाडांना टोमॅटो आणि वांगी लागली आहे. यामुळे सध्या देवेंद्र दवंडे यांच्या या शेतीतील प्रयोगाची सर्व स्तरात चर्चा होत आहे.

कलम पद्धती जगतमान्य

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, “कलम पद्धती ही शेतीसाठीची जगतमान्य पद्धत (Farming Techniques) आहे. जगभरातील विकसित देशांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात ‘या’ पद्धतीने शेती करत आहे. यात प्रामुख्याने शेतकरी एका-एका झाडावर चार प्रकारची फळे पिकवत आहे. टोमॅटो, वांगी, बटाटा आणि मिरची या पिकांचे एकावेळी उत्पादन घेतले जाऊ शकते.”

किती मिळते उत्पादन?

शेतकरी देवेंद्र दवंडे सांगतात, कलम पद्धतीने लावलेल्या झाडांना वर्षाला 50 ते 100 किलो वांगी आणि 30 से 40 किलो टोमॅटो उत्पादन मिळते. वांग्याच्या झाडाला वर्षभर फळ मिळू शकते. मात्र, टोमॅटो पिकाला वर्षभरात काही कालावधीपर्यंत फळ मिळत असल्याने उत्पादन कमी मिळते. ते सांगतात, याशिवाय आपण केलेल्या या अनोख्या प्रयोगाची सध्या समाजमाध्यमावर विशेष चर्चा असून, अनेक आपल्याकडे प्रत्यक्ष एकाच झाडाला लागलेली फळे पाहणीकडे येत आहेत.