हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) यावर्षी देशभरात (Agriculture Sector) सरासरीच्या तुलनेत 106 टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता नुकतीच व्यक्त केली आहे. याशिवाय स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने देखील यावर्षी देशात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. अशातच आता “यावर्षी शेती क्षेत्रातील (Agriculture Sector) विकास दरात 6 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मॉन्सूनचा पाऊस हा चांगला बरसणार आहे. त्यामुळे ही वाढ दिसून येणार आहे.” असे नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटले आहे.
‘ही’ आहेत वाढीची दोन कारणे (Agriculture Sector Growth Rate 6 Percent This Year)
नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी म्हटले आहे म्हटले आहे की, चालू वर्ष हे शेतीसाठी खूपच चांगले राहणार आहे. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत, एक म्हणजे यंदा हवामान विभागासह विविध हवामान संस्थांनी मॉन्सूनचा पाऊस देशभरात सर्वदूर चांगला पडणार असल्याचे म्हटले आहे. आणि दुसरे कारण म्हणजे मागील वर्षी देशातील शेती क्षेत्राचा (Agriculture Sector) वृद्धी दर हा 0.67 टक्के होता. अर्थात 2024-25 यावर्षी शेती क्षेत्राच्या वृद्धीसाठी बेस हा कमी असणार आहे. त्यामुळे यापूर्वी आतापर्यंत जेव्हा जेव्हा ही दोन कारणे असतात. तेव्हा या दोघांमुळे कृषी क्षेत्राचा वृद्धी दर हा 6 टक्क्यांहून अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
…तर निर्यातीस परवानगी मिळणार
याशिवाय यंदा खरीप हंगामाच्या मध्यावधीत काही कृषी मालाच्या उत्पादनात भरघोस वाढ होणार असल्याचे दिसून आले. तर अशा कृषी मालाच्या निर्यातीसाठी परवानगी दिली जाऊ शकते. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून गैर-बासमती तांदूळ, गहू, साखर, कांदा यासह अनेक कृषी मालाच्या निर्यातीस बंदी घातली आहे. मात्र, यंदाच्या हंगामात चांगला पडल्यानंतर विविध पिकांच्या उत्पादनाचे संकेत समोर येताच या कृषीमालाच्या निर्यातीस मोकळीक दिली जाऊ शकते. असेही त्यांनी म्हटले आहे.