हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा (Dudhiya Malda Mango) हा ‘फळांचा राजा’ (King Of Fruits) आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यातच हापूस आंबा (Alphonso Mango) म्हटलं की ‘देशाची शान’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण भारतात हापूस व्यतिरिक्त पण आंब्याच्या प्रजाती आहेत ज्या त्यांच्या चवीमुळे आणि वेगळेपणा मुळे प्रसिद्ध आहे. अशाच एका आंब्याच्या प्रजातीचे नाव आहे ‘दुधिया मालदा’(Dudhiya Malda Mango). गंगेच्या पाण्यातून मिळालेला अमृतसर असे या आंब्याचे वर्णन करण्यात येते.
बिहारमधील पाटण्यातील (Patana, Bihar) या आंब्याची (Mango) चव आणि गोडवा इतकी अप्रतिम आहे की एकदा या आंब्याची चव घेणारा या आंब्याला विसरू शकत नाही असे म्हणतात. या आंब्यामध्ये एवढं खास काय आहे?
- दुधिया मालदा आंबा (Dudhiya Malda Mango) आतून मऊ आणि रसाळ आणि अप्रतिम गोडवा असलेला आहे.
- या आंब्याचा गर मऊ आणि दुधासारखा असतो. त्यामुळेच याला ‘दुधिया मालदा’ असे नाव मिळाले आहे.
- या आंब्याची साल पातळ आणि हलकी असते. त्यामुळे तो खाण्यास खूप सोयीस्कर असतो.
- दुधिया मालदा आंब्याचा सुगंध इतर आंब्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक असतो.
- दुधिया मालदा आंब्याची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्याला दुधातून सिंचन (Irrigated with Milk) केले जाते.
‘दुधिया मालदा’ आंब्याचा इतिहास (Dudhiya Malda Mango History)
लखनऊचे नवाब फिदा हुसेन यांना दूध आणि आंब्याची खूप आवड होती. त्यांनी पाटण्यातील दिघा येथे दुधाचे सिंचन केलेले आंब्याचे रोप लावले होते. या आंब्याला ते दुधाने सिंचन करत होते. यातून अनेक दिवसांनी ‘दुधिया मालदा’ (Dudhiya Malda) नावाची अद्भुत प्रजाती तयार झाली.
दुधिया मालदा आंब्याची लोकप्रियता
दुधिया मालदा आंबा (Dudhiya Malda Mango) आजही तितकाच लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी 33 देशांमध्ये हे आंबे निर्यात (Mango Export) करण्यात आले होते. अमेरिका, इंग्लंड, जपान, दुबई अशा अनेक देशांमध्ये हा आंबा आवडीने खाल्ला जातो. विदेशातून दरवर्षी या आंब्याची ऑर्डर येते. हा आंबा जून मध्ये पिकतो आणि 100 रुपये किलो दराने विकला जातो.
दुधिया मालदा आंबा कुठे मिळतो?
आजकाल दुधिया मालदा आंबा पाटण्यातील राजभवन, बिहार विद्यापीठ आणि सेंट झेवियर कॉलेज मध्येच मिळतो. पूर्वी ही बाग एक हजार एकरांवर पसरलेली होती, पण काळानुसार बागेचा आकार कमी होत गेला आहे.
त्यामुळे शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर दुधिया मालदा या आंब्याची लागवड करायची असल्यास किंवा माहिती घ्यायची असल्यास नक्कीच वर सांगितलेल्या ठिकाणी संपर्क साधा, आणि एकदा तरी या आंब्याची (Dudhiya Malda Mango) चव चाखून बघा.