हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Cow Breeds) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. दूध उत्पादनासाठी गाय किंवा म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘फुले त्रिवेणी’ ही गाय दुधासाठी सर्वात चांगली मानली गेली आहे. या जातीच्या गायीच्या (Cow Breeds) मदतीने दूध व्यवसाय सुरु केल्यास शेतकऱ्यांच्या घरी दुधाची गंगा वाहण्यास मदत होणार आहे.
तीन जातींचा आहे संकर (Cow Breeds In Maharashtra)
‘फुले त्रिवेणी’ ही जात म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली गायीची ‘फुले त्रिवेणी’ जात (Cow Breeds) होय. फुले त्रिवेणी ही गाईची एक सुधारित जात आहे. या गाईची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे ही होलस्टेन फ्रीजियन ५० टक्के, जर्सी २५ टक्के व गीर २५ टक्के या जातींचा संकर मिळून तयार करण्यात आली आहे.
वेताला किती देते दूध?
‘फुले त्रिवेणी’ ही गाय तीन गायींचा एकत्रित वंश असल्याने या गाईला फुले त्रिवेणी असे नाव देण्यात आले आहे. या जातीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन मिळत आहे. ही जात एका वेतात 3000 ते 3500 लिटरपर्यंत दूध देत आहे. तसेच ‘फुले त्रिवेणी’ या गायीची रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो.
पिढीजात उत्पादन वाढतेच
‘फुले त्रिवेणी’ या जातीमध्ये मूळ जातीची गाय जेवढे उत्पादन देते. तिची पुढील पिढी देखील तेवढे उत्पादन देते. या जातीचे वळुंचे गोठीत वीर्य महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील हवामानात या जातीचे संगोपन फायदेशीर आहे. यामुळे तज्ञांकडून या गाईच्या संगोपनाचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आता तुम्ही देखील या जातीच्या गायीच्या पालनातून मोठी आर्थिक प्रगती साधू शकतात.