हॅलो कृषी ऑनलाईन: ‘नवीन काही शिकण्यासाठी तुमच्यात पुरेशी जिद्द हवी!’ (Success Story) हे वाक्य आहे महाराष्ट्रातील पहिली महिला ड्रोन पायलट (Maharashtra’s First Drone Didi) म्हणजेच पहिली ड्रोन दीदीलिंटा शेळके यांचे (Success Story).
लग्नानंतर बहुतेक महिला स्वत:च्या संसारात, चूल आणि मुल या नेहमीच्या जीवनात रमतात. परंतु काही महिला अशाही असतात ज्या जिद्दीच्या बळावर एक नवी ओळख निर्माण करतात. ते सुद्धा घरातील सर्व कर्तव्य पार पाडून. लिंटा शेळके (Linta Shelke) त्यातलीच एक जिद्दी महिला आहे.
केंद्राने “ड्रोन दीदी योजना” (Drone Didi Yojana) जाहीर करण्यापूर्वीच लिंटा शेळके या ड्रोन क्षेत्रात कार्यरत होत्या. शेळके तिच्या प्रवासाचे वर्णन करताना सांगतात की हा एक तिने केलेल्या प्रगतीचा सुंदर प्रवास आहे. ज्यामध्ये तिच्या तीन वर्षांच्या मुलाची काळजी घेणे आणि घरातील कामे करणे या मर्यादेतून बाहेर पडून तिने महाराष्ट्राची पहिली महिला ड्रोन पायलट आणि भारताची दुसरी महिला ड्रोन पायलट होण्याचा मान मिळवला आहे (Success Story).
महिला ड्रोन पायलट होण्याचा प्रवास (Success Story)
लिंटा शेळके सांगतात की त्यांना सुरुवातीला, ड्रोन उडवणे अवघड वाटले, परंतु ॲग्री-टेक स्टार्टअप, (Agri Tech Start Up) सलाम किसानने तिला संपूर्ण प्रक्रियेत साथ दिली. कंपनीने तिच्या ट्रेनिंग दरम्यान मुलाला तिच्या सोबत प्रशिक्षणासाठी घेऊन जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे मुलाला कुठे ठेवायचे ही तिची चिंता मिटली आणि ड्रोन पायलट (Drone Pilot) होण्याचा तिचा पुढचा प्रवास सोपा झाला. लिंटा आता केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांना प्रेरित करते. “महिलांनी काहीतरी नवीन शिकण्यासाठी जिद्दी असायला हवी, नवीन पिढीच्या मुली विमान उडवू शकतात तर ड्रोन का नाही,” असे ती म्हणते.
शेळके यांचा सर्व महिलांना सल्ला
शेळके महिलांना कोणत्याही वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष करून जीवनातील आव्हाने स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करतात. “लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो. त्यामुळे मी तरुण महिलांना त्यांचे शिक्षण आणि कौशल्ये वाया घालवू नयेत याबद्दल प्रोत्साहन देते,” असे ती म्हणते.
ॲग्री-टेक स्टार्टअप, सलाम किसान यांच्याशी जुळून जसे लिंटा शेळके यांनी स्वत:चे आयुष्य बदलले (Success Story)त्याप्रमाणे देशातील इतर महिलादेखील त्यांच्या जीवनाला योग्य वळण देऊन त्यांच्या पायावर उभे राहू शकतात, असे लिंटा शेळके यांना वाटते.
भारत सरकारने सुरू केलेली ‘नमो ड्रोन दीदी’ (Namo Drone Didi Yojana) योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील स्वयं-सहायता गटांचा भाग असलेल्या 15,000 महिलांना ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लखपती दीदींच्या (Lakhpati Didi Scheme) नावाखाली ही योजना जाहीर केली.