हॅलो कृषी ऑनलाईन: कडधान्य पिकांमध्ये तूर (Tur Variety) डाळीला महत्त्वाचे स्थान आहे. सध्या बाजारात तुरीला भाव (Tur Rate) सुद्धा जास्त मिळत आहे, त्यामुळे ज्या शेतकर्यांना डाळवर्गीय पिकांपैकी तुरीची लागवड करून चांगला नफा मिळवायचा आहे, त्यांनी सुधारित वाणांची (Tur Improved Variety) लागवड करावी जे अधिक उत्पादन देतील. आज आपण तुरीच्या अशाच सुधारित वाणांची माहिती जाणून घेणार आहोत. तुरीच्या अनेक सुधारित जाती आहेत ज्यातून शेतकरी कमी वेळेत जास्त उत्पादन घेऊ शकतात. आज आपण तुरीच्या टॉप 3 वाणांची (Tur Variety) माहिती जाणून घेऊ या.
तुरीच्या टॉप 3 सुधारित जाती (Tur Variety)
- पुसा – 16 (Pusa-16 Arhar)
तुरीची ही जात 120 दिवसात कापणीसाठी तयार होते. तुरीच्या या जातीची लागवड खरीप हंगामात सुद्धा करता येते. ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा, नवी दिल्ली यांनी विकसित केली आहे.
ही जात कमी उंचीची असण्या सोबतच जास्त उत्पादन देणारी जात आहे. ही जात सरळ वाढते आणि मजबूत आहे. त्यामुळे वादळातही पिकाचे नुकसान होत नाही. पुसा अरहर-16 चे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर सुमारे 20 क्विंटल आहे आणि 100 दाण्यांचे वजन सुमारे 7.4 ग्रॅम आहे. ही जात राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशसाठी योग्य असल्याचे आढळून आले आहे.
- पुसा – 992 (Pusa 992 Arhar)
भारतीय संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पुसा-992 ही तुरीची जात (Tur Variety) संशोधित केलेली आहे. ही देखील कमी वेळेत येणारी आणि जास्त उत्पादन देणारी जात आहे. ही जात 120 ते 128 दिवसांत पक्व होते. या जातीची पेरणी जुलै महिन्यात करता येते आणि ऑक्टोबरामध्ये पीक तयार होते. या जातीची विशेष गोष्ट म्हणजे याच्या सर्व शेंगा एकाच वेळी पिकतात. या जातीच्या शेंगा पूर्ण भरलेल्या, जाड, गोलाकार आणि चमकदार असतात. या जातीपासून एकरी 7 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
- आयपीए – 203 (IPA 203)
तुरीची ही जात (Tur Variety) 150 दिवसांत पक्व होते. या जातीची खास वैशिष्ट्ये म्हणजे ही जात रोगांना प्रतिरोधक आहे. या जातीचे सरासरी उत्पादन 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर आहे.