हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकरी व पशुपालक दुधाच्या व्यवसायातून (Dairy Farming) चांगला नफा कमावताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना चांगल्या जातीच्या गायींविषयी माहिती असायला हवी. गायींची जात दुधासाठी जितकी चांगली असेल तितका नफा जास्त मिळतो. गायीच्या अशाच एका प्रगत जातीबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या जातीच्या गाईचे नाव आहे हरधेनू गाय. या गाईचे संगोपन करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करू शकतात.
तीन गायींचा आहे संकर? (Dairy Farming In Maharashtra)
उत्तर-अमेरिकन, देसी हरियाणा आणि साहिवाल जातीच्या हरधेनू या जातीच्या गायी अधिक दूध (Dairy Farming) देण्याची क्षमता असलेल्या गायी आहेत. या जातीमध्ये उत्तर-अमेरिकेच्या रक्ताचा 62.5 टक्के तसेच हरियाणा आणि साहिवाल जातीच्या रक्ताचा 37.5 टक्के समावेश आहे. हरियाणा प्रदेशासाठी हरधेनू गायीची जात अतिशय योग्य मानली जाते. इतकेच नाही तर देशभरातील सर्वच भागांमध्ये या जातीच्या गायीचे पालन केले जाऊ शकते.
किती देते दूध?
शेतकरी हरधेनु गाईच्या पालनाने चांगला नफा मिळवू शकतात. कारण ही एक वेगाने वाढणारी जात आहे. हरधेनू गाईची इतर गायींशी तुलना केल्यास स्थानिक जात दररोज सरासरी 5 ते 6 लिटर दूध देते. परंतु हरधेनु गाय दररोज सरासरी 15 ते 16 लिटर दूध देऊ शकते. ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलो हिरवा चारा तसेच 4 ते 5 किलो सुका चारा खाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना या गायीच्या जातीपासून अधिक दूध उत्पादन देखील मिळते.
काय आहेत हरधेनु गाईची वैशिष्ट्ये?
- ही गाय सुमारे 20 महिन्यांत प्रजननासाठी तयार होते, तर स्थानिक जातीला यासाठी 36 महिने लागतात.
- ही गाय 30 महिन्यांपासून वासरू देण्यास सुरुवात करते, तर इतर जाती 45 महिन्यांपासून वासरू देतात.
- या गाईंची दूध देण्याची क्षमता जास्त असते.
- त्यांच्या दुधात फॅटचे प्रमाण अधिक आढळते.
- या गायी कोणत्याही तापमानात राहू शकतात.
- यातून 50 ते 55 लिटर दूध मिळू शकते.