हॅलो कृषी ऑनलाईन: नागरिकांना सौर ऊर्जेचा (PM Surya Ghar Yojana) वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजना’ (PM Surya Ghar Yojana) सुरू केली आहे. या योजने अंतर्गत, घराच्या छतावर रूफटॉप सोलर सिस्टम बसवून नागरिक 300 युनिटपर्यंत मोफत वीज (Free Electricity) मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, सरकारकडून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदानही दिले जाते.
योजनेचे फायदे (PM Surya Ghar Yojana Benefits)
- या योजनेद्वारे (PM Surya Ghar Yojana) 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळते.
- रूफटॉप सोलर सिस्टमसाठी (Rooftop Solar System) 78 हजार रूपयांपर्यंत अनुदान मिळते.
- सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर करून वीज निर्मिती केल्याने वीज बिल शून्य होऊ शकते.
- सौर ऊर्जा (Solar Power) हा स्वच्छ आणि अक्षय ऊर्जा स्रोत आहे त्यामुळे पर्यावरणास पूरक आहे.
- घराची उर्जेची गरज पूर्ण करता येऊन ऊर्जा स्वावलंबन मिळते.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
- भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- स्वत:चे घर असणे आवश्यक आहे.
- घराच्या छतावर पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.
अनुदान रक्कम
1 किलोवॅटसाठी – 30,000 रुपये
2 किलोवॅटसाठी – 60,000 रुपये
3 किलोवॅटसाठी – 78,000 रुपये
नोंदणी
वीज ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा “पीएम सूर्यघर” नावाच्या मोबाईल ॲपद्वारे (PM Surya Ghar Mobile App) ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीज बिल
- घराचे मालकी हक्काचे कागदपत्रे
अधिक माहितीसाठी
महावितरण ग्राहक केंद्र
पीएम सूर्यघर वेबसाइट
पीएम सूर्यघर मोबाईल ॲप