हॅलो कृषी ऑनलाईन: देशातीलशेतकर्यांनी आता खरीप हंगामाची (Kharif Maize Cultivation) तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात अनेक पिके घेतली जात असली तरी. परंतु, देशाच्या बहुतांश भागात भात किंवा मक्याची लागवड (Maize Farming) केली जाते. मात्र, शेतकरी अनेकदा संभ्रमात पडतात की मका पिकवायचा की भात? जर आपण भाताबद्दल बोललो तर ते खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. देशात धानाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र धानापेक्षा मका शेती (Maize Crop) ही शेतकर्यांना जास्त फायदेशीर आहे.
धानाच्या तुलनेत मका लागवडीत (Kharif Maize Cultivation) शेतकर्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. मक्याचा भावही (Maize Rate) चांगला असेल तर त्याची विक्री करून शेतकर्यांना चांगला नफा मिळतो. विशेषत: मक्यावर प्रक्रिया (Maize Processing) केल्यानंतर त्यापासून अनेक उत्पादने तयार केली जातात. त्यामुळे त्याला बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
मका शेतीतील आर्थिक फायदा (Kharif Maize Cultivation)
मक्याची लागवड करून शेतकरी हेक्टरी 68 हजार रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळवू शकतात. तर भातशेती करून शेतकऱ्यांना केवळ 35 हजार रुपये प्रति हेक्टर निव्वळ नफा मिळू शकतो.
खरीपातील मका लागवडीचे फायदे (Kharif Maize Cultivation Benefits)
पाण्याची कमी गरज: मका पिकाला खूप कमी पाणी लागते. एकीकडे मका पिकवण्यासाठी 627-628 मिमी/हेक्टर पाणी लागते, तर भात पिकवण्यासाठी सरासरी 1000-1200 मिमी/हेक्टर पाण्याची गरज असते.
कमी कालावधी: मक्याचे वाढीचे चक्र भातापेक्षा कमी असते. यामुळे शेतकर्यांना पिकाची लवकर कापणी आणि विक्री करता येते.
उच्च उत्पादन क्षमता: खरीप मक्याचे सरासरी उत्पादन (Maize Yield) 50-55 क्विंटल/हेक्टर आहे. तर भाताचे सरासरी उत्पादन 35-40 क्विंटल/हेक्टर आहे.
कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी: भातापेक्षा मक्यावर किडीचा प्रादुर्भाव कमी असतो आणि कीड व्यवस्थापनाचा खर्चही कमी असतो.
बाजारातील उच्च मागणी आणि किमती: खरीप मका सामान्यत: रब्बी मक्यापूर्वी काढला जातो आणि पुरवठा तुलनेने कमी असताना बाजारात उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकर्यांना चांगला भाव मिळतो.
पीक फेरपालटीचे फायदे: खरीप मका हे गहू किंवा कडधान्ये यांसारख्या इतर पिकांसोबत फेरपालट करून घेता येते त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारते आणि कीड आणि रोगांचा संचय कमी होतो.
पीक विविधता: खरीप मका पीक घेतल्याने पिकात विविधता निर्माण करता येते. ज्यामुळे एकच पीक (उदा. भात) वाढण्याशी संबंधित जोखीम कमी होते. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक चक्र सुधारण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांना अधिक नफाही मिळतो.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेता शेतकर्यांनी या खरीपात मका लागवडीला (Kharif Maize Cultivation) प्राधान्य देण्यास हरकत नाही.