हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात जून महिन्यात सर्वसामान्यपणे पावसाळा सुरु (Seeds Germination Test) होतो. संपूर्ण पावसाळयाच्या काळात मृग ते स्वाती अशी एकूण 11 नक्षत्रे असतात. मात्र, आजपासून (ता.24) सुरु होणारे रोहिणी नक्षत्र हे देखील मान्सूनपूर्व पावसाचे नक्षत्र धरले जाते. ज्यामुळे आता रोहिणी नक्षत्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांची यंदाच्या खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे. मात्र, पेरणीच्या काळात शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी समस्या बियाण्याच्या उगवण क्षमतेबाबत (Seeds Germination Test) असलेल्या साशंकतेबाबत असते.
उगवण क्षमतेबाबत साशंकता (Seeds Germination Test For Farmers)
परिणामी शेतकऱ्यांना आपण पेरणी करत असलेले बियाणे किती प्रमाणात उगवेल? (Seeds Germination Test) याबाबत संभ्रम असतो. सध्या बहुतेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यात मान्सूनचा पाऊस देखील काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी पेरणीच्या तयारी लागले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरले असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच, बियाण्याची पेरणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी घरच्या घरी बियाणांची उगवणक्षमता कशी तपासावी? याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
बियाण्याची उगवण क्षमता अशी तपासा?
- सुरुवातीला पेरणी करणाऱ्या बियाण्यातील शंभर बियाणे घेऊन एक गोणपाट ओले करून घ्यायचे.
- त्यामध्ये दहा ओळी करून हे शंभर बियाण्याची मांडणी करावी व ते गोणपाट ओलसर राहील, याची काळजी घ्यावी.
- त्यानंतर चार ते पाच दिवसांनी शंभर बियाण्यापैकी किती उगवले हे तपासावे.
- यातील समजा सत्तर बियाणे उगवले तर बियाण्याची क्षमता सत्तर टक्के, असे समजून पेरणी करताना अधिकचे बियाणे पेरणी करावी.
- यामध्ये उगवण क्षमता तपासणी केल्यामुळे शेतकऱ्याचे संभाव्य नुकसान टाळता येते.
- शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्यावर त्याची पावती घ्यावी व बी-बियाण्याची पेरणी करताना प्रत्येक बॅगमधील काही बियाणे शिल्लक ठेवावे.
- बॅग फोडताना शक्यतो तळातून कापावी त्यामुळे बियाणाच्या बॅग वरील नंबर कायम राहतात, यामुळे जर बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीवर कार्यवाही करता येते, त्यासाठी शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रिया करूनच पेरणी करावी. एकदल बियाण्यासाठी अझोटोबॅकतर व द्विदल पिकासाठीराय झोबियमचा वापर करावा. बियाण्याची उगवण क्षमता अगदी घरगुती पद्धतीने तपासणी करून पेरणी केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान टाळता येईल.