हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी अनेक वनस्पतींची पिकांची शेती (Tamarind Production) करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे या वनस्पतींमध्ये दीर्घकालीन वनस्पतींना देखील प्राधान्य देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना एकदा लागवड केल्यानंतर त्यातून वर्षानुवर्षे उत्पन्न मिळण्यास मदत होते. याच पार्श्वभूमीवर आज आपण वनस्पती पीक असलेल्या चिंचेच्या लागवडीमध्ये आघाडीवर असणाऱ्या पहिल्या सहा राज्यांबद्दल जाणून घेणार आहोत. या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? पहिली सहा चिंच उत्पादक राज्य कोणती? देशात एकूण किती चिंच उत्पादन (Tamarind Production) होते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कर्नाटक राज्य प्रथम स्थानी (Tamarind Production In India)
चिंच म्हटले की अगदी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटते. भारत हा जगातील सर्वात मोठा चिंच उत्पादक देश असून, या ठिकाणी दरवर्षी जवळपास ३ लाख टन चिंचेचे उत्पादन होते. तर देशातील सर्वाधिक चिंचेचे उत्पादन (Tamarind Production) हे कर्नाटक या राज्यामध्ये होते. अर्थात कर्नाटक हे राज्य देशात चिंचेच्या उत्पादनात प्रथम स्थानी असून, त्या ठिकाणी देशातील एकूण चिंच उत्पादनापैकी 28.04 टक्के चिंचेचे उत्पादन होते.
अनेक आयुर्वेदिक फायदे
जिभेवर ठेवताच आंबट लागणारी आणि सर्वांना हवीहवीशी वाटणारी चिंच ही आयुर्वेदिक दृष्टीने देखील खूप महत्वपूर्ण मानली जाते. ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. दरम्यान, तामिळनाडू हे राज्य कर्नाटक या राज्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक चिंच उत्पादन करणारे राज्य आहे. त्या ठिकाणचे शेतकरी हे देशातील एकूण चिंच उत्पादनापैकी 25.99 टक्के चिंच उत्पादन घेतात.
महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी
इतकेच नाही तर चिंचेचा उपयोग हा स्वयंपाक घरात विविध बाबींसाठी होतो. ज्यामुळे गृहिणींकडून देखील चिंचेला विशेष मागणी असते. दरम्यान, चिंचेच्या उत्पादनात देशात केरळ हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण उत्पादनापैकी 18.57 टक्के चिंच उत्पादन होते. तर आंध्रप्रदेश हे राज्य चिंच उत्पादनात चौथ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी देशातील एकूण उत्पादनापैकी 8.23 टक्के उत्पादन होते. याशिवाय 7.28 टक्के उत्पादनासह तेलंगणा हे राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. तर चिंचेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागतो.