Buying Agricultural Land: शेतजमीन विकत घ्यायची आहे, परंतु 7/12 नावे नाही; जाणून घ्या काय करता येईल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: एखाद्याला शेतजमीन विकत घ्यायची असते (Buying Agricultural Land), त्याला शेतीची खूप आवड असते, परंतु त्यांच्या नावाने 7/12 (Satbara) नसतो. त्यांच्या पूर्वजांजवळ शेती (Ancestral Agriculture Land) होती, परंतु काही कारणास्तव ते विकली गेली असते त्यामुळे अशा लोकांना शेतजमीन खरेदी (Buying Agricultural Land) करता येते का असा प्रश्न बहुतेक जणांना पडतो.

शेतकरी असणार्‍या कुटुंबालाच शेतजमीन देण्याचा नियम आल्यानंतर अनेकांपुढे शेतजमीन घेण्याचा (Buying Agricultural Land), प्रश्न उभा राहला. शेती करायची इच्छा असलेल्या अनेकांना केवळ वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे शेतजमीन खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला.

शेतजमि‍नीवर शेतकर्‍यांचा अधिकार असल्याच्या उद्देशाने हा कायदा अस्तित्वात आला. अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये आधीच्या पिढ्यांनी शेतजमीन विकल्याचे समोर आले. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यामुळे शेतजमीन घेताना मर्यादा आल्या.

वडिलोपार्जित शेतजमीन नसली तरी आपल्या आजोबांच्या शेतीचे वारस (Heirs Of Agriculture) तुम्ही होतात आणि त्या काळातला सातबारा आहे, याचा पुरावा सादर करावा लागतो. ती शेती आजोबांनी कधी कोणाला विकली याची तारीख माहीत असेल तर किंवा त्या माणसाकडून त्या विक्री पत्राची एक कॉपी (7/12 Land Records) घेतली तर त्यावरून तुम्हाला शेतीचा जुना 7/12 खाते क्रमांक मिळेल.

त्या नंबरवरून जुना रेकॉर्ड बघून जुन्या काळच्या रेकॉर्डची कॉपी मिळवता येईल. यावरून वंशपरंपरेने शेतकरी आहात हे सिद्ध करता येते. त्यावरून शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी यांच्याकडून तयार करून घेणे हा उत्तम पर्याय असतो. या कागदाची पूर्तता झाली तर तुम्हाला शेतजमीन विकत घेता येईल (Buying Agricultural Land).

याशिवाय काका, चुलत काका, आईचे वडील इत्यादींना सांगून त्यांच्या शेतात हिस्सा घेणे किंवा देत आहे, असे म्हणून नाव घालून घेणे हा एक पर्याय अलीकडे वापरला जातो. असे केले तरी शेतकरी म्हणून नाव लागू शकते. हे तात्पुरते स्वरुपात आहे आणि मग शेती घेऊन झाली की परत हक्कसोड करता येते.

यात नैतिक प्रश्न जरूर येऊ शकेल, पण कायद्याच्या विरोधात काहीही नाही. ज्याला वारस म्हणून शेती मिळते तो आपोआप शेतकरी (Farmer) होतोच. एमएलआरसीच्या कलम 70 अ व 70 ब चा उपयोग करूनही शेतकरी होण्याचा मार्ग खुला होतो (Buying Agricultural Land).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.