हॅलो कृषी ऑनलाईन: खरीपात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक म्हणजे सोयाबीन (Soybean Variety). बहुतेक शेतकरी सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) करण्याच्या तयारीत असतील आणि त्यासाठी वेगवेगळ्या वाणांचे सोयाबीन बियाणे विकत घेत असतील. हा लेख सोयाबीन लागवड करणाऱ्या शेतकर्यांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. जाणून घेऊ या जमिनीच्या प्रकारानुसार (Soil Type) सोयाबीनच्या कोणत्या वाणाची (Soybean Variety) पेरणी केली पाहिजे.
जमिनीच्या प्रकारानुसार सोयाबीनच्या वाणाची निवड (Soybean Variety)
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांनी त्यांच्या जमिनीच्या मगदूरानुसार (Soybean Variety As per soil Texture) सोयाबीन वाणाची निवड केली पाहिजे.
हलकी जमीन: हलकी जमीन (Light Soil) असेल तर 85 ते 95 दिवसात कापणीसाठी तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाची (Soybean Variety) निवड केली पाहिजे.
या जमिनीत लागवडीसाठी जे.एस.-9305, पी.के. व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-10039), एम.ए.यु.एस.-725, एम.ए.सी.एस. -1460 आर.व्ही.एस.एम.-18, एम.ए.यु. एस-158, एम. ए.यु.एस.-612, जे.एस. -335 या सोयाबीनच्या जातींची (Soybean Variety) निवड करावी.
मध्यम जमीन: अशा जमिनीत (Medium Soil) शेतकऱ्यांनी 95 ते 100 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड केली पाहिजे.
हलकी ते मध्यम जमीन: अशी जमीन (Light To Medium Soil) असल्यास जे.एस.- 9305, पी.के. व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस-10039), एम.ए.यु.एस.- 725, एम.ए.सी.एस.-1460 आर.व्ही.एस.एम.- 18, एम.ए.यु.एस-158, एम. ए.यु.एस.- 612, जे.एस. – 335 या सोयाबीनच्या जातींची (Soybean Variety) निवड करायला काही हरकत नाही.
भारी जमीन: अशा जमिनीत मध्यम ते उशिरा येणारे वाण निवडावे. भारी जमीन (Heavy Soil) असेल आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता असेल तेव्हाच उशिरा येणाऱ्या वाणाची निवड करावी. जर भारी जमीन असेल आणि पाण्याची सोय नसेल तर मध्यम कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
भारी जमिनीसाठी शेतकरी बांधव फुले किमया, फुले संगम, फुले दुर्वा, एम. ए.यु.एस-71, एम. ए.यु.एस- 612, फुले कल्याणी, तसेच पी.के.व्ही.-अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस -10039) या सोयाबीन जातींची निवड करू शकतात.
सोयाबीन वाण लागवडीसंबंधी महत्त्वाची सूचना (Soybean Variety)
शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्वच क्षेत्रावर फक्त एका प्रकारचे वाण लावणे टाळावे. म्हणजेच पाच एकर क्षेत्र असेल तर त्यापैकी काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची आणि काही क्षेत्रावर वेगळ्या जातीची लागवड करावी. जेणेकरून शेतकर्यांना एका जातीपासून चांगले उत्पादन मिळाले नाही तर दुसर्या जातीपासून चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकर्यांना तोटा सहन करावा लागणार नाही. तुम्ही तुमच्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे तुमच्या क्षेत्रात दोन-तीन प्रकारच्या जातींची लागवड केल्यास तुम्हाला निश्चितच चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकणार आहे.