हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मका या पिकाखालील लागवड क्षेत्र (Black Maize Farming) मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात मकाची लागवड करतात. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून मका पिकाला बाजारभाव देखील चांगला मिळत आहे. अशातच आता देशी मक्यावरील अनेक वर्षांच्या संशोधनानंतर छिंदवाडा येथील कृषी संशोधन केंद्रात काळ्या म्हणजेच रंगीत मक्याचे संशोधन करण्यात आले आहे. काळ्या मक्याची खास गोष्ट म्हणजे त्यात जस्त, तांबे आणि लोहाचे प्रमाण चांगले असते. हीच बाब लक्षात घेऊन छिंदवाडा येथील कृषी संशोधन केंद्राने काळ्या मक्याची जवाहर मका 1014 ही नवीन जात (Black Maize Farming) विकसित केली आहे.
किती दिवसात येते काढणीला? (Black Maize Farming)
मका लागवड ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. बेबी कॉर्न आणि स्वीट कॉर्नची मका लागवड देशभरात केली जाते. अशातच आता शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी काळ्या मक्याची (Black Maize Farming) देखील लागवड करू शकणार आहे. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते तयार होण्यासाठी केवळ 90 ते 95 दिवस लागतात. आणि त्याचे उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. भारतात काळ्या मक्याच्या एका कणसाची किंमत सुमारे 200 रुपये आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
काळी मका हेल्दी उत्पादनांमध्ये वापरली जाते. ही मक्याची पहिली जात आहे. जी पौष्टिक आणि जैव-फोर्टिफाइड आहे. मक्याच्या दाण्यांचा रंग सामान्यतः पिवळा असतो. परंतु या नवीन प्रजातीचा रंग काळा, लाल आणि तपकिरी असतो. मक्याची ही नवीन जात पक्व होण्यासाठी 95 ते 97 दिवस लागतात. एकरी 8 किलो बियाणे लागवड करून शेतकरी 26 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात.
किती मिळतो भाव?
काळ्या मक्याचे तंतू वाढण्यास सुमारे 50 दिवस लागतात. काळ्या मक्याच्या लागवडीसाठी उष्ण हवामान योग्य मानले जाते. जेव्हा मका त्याच्या रोपामध्ये तयार होतो. तेव्हा त्याला जास्त पाणी द्यावे लागते. मक्याच्या या जातीची लागवड ओळींमध्ये केली जाते. एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर सुमारे 60 ते 75 सें.मी. काळी मका खोड रोगास सहनशील आहे. ही वाण पावसाच्या प्रदेशासाठी, विशेषतः पठारी भागात अतिशय योग्य आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन वेबसाइट्सवर काळ्या मक्याच्या एका कणसाची किंमत 200 रुपये आहे. काळ्या मक्याचा भाव नेहमीच सामान्य मक्यापेक्षा जास्त असतो.