PM Kisan Scheme : ‘या’ दिवशी मिळणार पीएम किसानचा 17 वा हप्ता; तत्पूर्वी करा ‘ही’ तीन कामे!

PM Kisan Scheme For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना (PM Kisan Scheme) राबवल्या जात आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम करत आहे. सरकारच्या अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार वर्षभरात शेतकऱ्यांना ३ हप्त्यामध्ये 6000 रुपये आर्थिक मदत देते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहे. आता लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, हा हप्ता जमा होण्यापूर्वी तुम्हीला तीन महत्वाची कामे करावी लागतील, अन्यथा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) 17 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार नाही.

सर्वप्रथम ‘या’ तीन गोष्टी करा (PM Kisan Scheme For Farmers)

  • ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पडताळणी केली नाही ते पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करु शकतात. ई-केवायसी पूर्ण केली असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा तुम्हाला 17 वा हप्ता मिळणार नाही.
  • तसेच तुम्हाला जमिनीची पडताळणी करणेही आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचा 17 वा हप्ता अडकू शकतो. यासाठी तुम्ही जवळच्या कृषी कार्यालयात जाऊ शकता.
  • बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, नोंदणी फॉर्ममध्ये बरोबर माहिती भरणे या गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा 17 वा हप्ता मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

कधी मिळणार 17 वा हप्ता?

पंतप्रधान किसान योजनेचा पुढचा हफ्ता आपल्या खात्यावर केव्हा जमा होईल, याची सर्वच शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेचा 17 वा हफ्ता जून महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेचा 16 वा हफ्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आता लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मिळते 6000 रुपयांची मदत

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत केली जाते. यामध्ये चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. आत्तापर्यंत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 17 व्या हप्त्यासाठी तात्काळ ई-केवायसी करणे गरजेचे आहे.