हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी सध्या त्यांच्या शेतात सतत नवनवे प्रयोग (Farmers Success Story) करायला लागले आहेत. विशेष म्हणजे या प्रयोगातून ते चांगली कमाई सुद्धा करत आहेत. असाच एक प्रयोग अहमदनगर (Ahmednagar Farmer) मधील अकोले तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकर्याने देखील यशस्वी (Farmers Success Story) करून दाखवला आहे.
तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी प्रसन्ना धोंडगे यांनी प्रामुख्याने उत्तर भारतात पिकवल्या जाणाऱ्या काळ्या गव्हाची (Black Wheat Farming) यशस्वी शेती करून दाखवली आहे. विशेष म्हणजे धोंडगे यांनी यशस्वी करून दाखवलेला हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे (Farmers Success Story) म्हटले जात आहे.
यामुळे सध्या धोंडगे यांची पंचक्रोशीत चांगलीचं चर्चा पाहायला मिळत आहे (Farmers Success Story).
धोंडगे यांच्या आई-वडिलांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी एकदा काळा गहू (Black Wheat) या आजारावर गुणकारी असल्याचे वाचले होते. त्यामुळे त्यांनी या गव्हाची सविस्तर माहिती घेतली आणि या गव्हाची लागवड (Wheat Cultivation) करण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम धोंडगे यांनी बियाणे कुठे मिळते याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे राहत असलेल्या आपल्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी पंजाब मधून काळ्या गव्हाचे बियाणे मागवले. त्यांनी 550 रूपयांना पाच किलो बियाणे खरेदी केले.
या बियाण्याचा (Black Wheat Seeds) वापर करून त्यांनी दोन गुंठे क्षेत्रात याची पेरणी केली. आता त्यांना यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. दोन गुंठ्यात लागवड केलेल्या गव्हातून त्यांना 45 किलो एवढे उत्पादन मिळाले आहे (Farmers Success Story).
यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून काळा गहू लागवड शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार असा विश्वास धोंडगे यांनी व्यक्त केला असून ते आगामी काळात काळा गहू लागवड वाढवणार आहेत.
काळ्या गव्हाला मिळणारा भाव (Black Wheat Price)
खरेतर काळ्या गव्हाची लागवड ही मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अधिक केली जाते. हा गहू मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून याचे सेवन केल्यास आरोग्य सुदृढ राहते. यामुळे बाजारात या गव्हाला अधिकचा भाव मिळतो (Farmers Success Story). सध्या काळा गहू बाजारात 70 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे.
धोंडगे यांनी उत्पादित केलेल्या गव्हापैकी दहा किलो गहू घरी खाण्यासाठी ठेवणार आहेत तर उर्वरित गहू बियाणे म्हणून वापरणार असून यातून त्यांना अधिकचे उत्पादन मिळवायचे आहे. शेतीमध्ये जर बदल केला तर चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते हे धोंडगे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे (Farmers Success Story).
काळ्या गव्हाचे पौष्टिक फायदे (Black Wheat Benefits)
- काळ्या गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाण, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फ्लेव्होनॉइड (टीएफसी) आणि फिनोलिक सामग्री (टीपीसी) अँटिऑक्सिडंट क्रिया पारंपरिक पिवळ्या गव्हापेक्षा जास्त असते.
- संशोधनानुसार काळा गहू हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग, जळजळ, कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणापासून संरक्षण करतो.
- काळ्या गव्हातील फायबर घटक कर्करोग, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.
- काळ्या गव्हात अँथोसायनिन असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
ब्लू बेरी आणि जांभूळ या फळांमध्ये अँथोसायनिनचे प्रमाणही जास्त असते. परंतु ही फळे वर्षभर उपलब्ध नसल्यामुळे, काळा गहू आपल्या दैनंदिन आहारात या पोषक तत्वांचा सहज स्रोत प्रदान करतो.