Farmers Success Story: भरघोस उत्पादन देणारी काजूची नवीन जात विकसित करणारा ‘संशोधक शेतकरी’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेतकरी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग (Farmers Success Story) करायला लागले आहेत. या प्रयोगातून त्यांच्याकडून नवीन वाण सुद्धा संशोधित केले जातात. आंबा पि‍काप्रमाणे काजू पीकही (Cashew Crop) खर्चिक झाले आहे. हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता घटू लागली आहे. यावर संशोधन करून लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात (Cashew New Variety) विकसित केली आहे (Farmers Success Story).

ही जात भरघोस उत्पन्न देणारी ठरणार असून, नव्या संशोधित जातीला ‘एकेआर’ (AKR) हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे (Farmers Success Story).

विद्यापीठाच्या वेंगुर्ला 4 काजूच्या (Vengurla 4 Cashew) जातीपासून 15 किलो उत्पादन मिळेल, असा विद्यापीठाचा दावा आहे. प्रत्यक्ष 5 ते 8 किलोच उत्पन्न मिळते, तर वेंगुर्ला 7 या काजूचे एक वर्षाआड उत्पन्न मिळते. तेही 3 ते 4 किलोच असते.

आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खामकर यांनी काजूच्या जातीवर संशोधन (Agriculture Research) केले. आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना त्याचे फलित सापडले आहे. गावठी काजूची जात निवडून त्याला कलम बांधले आहे. त्यांनी लागवड केलेली रोपे अन्य शेतकरी मित्रांनाही देऊन उत्पादकता तपासली असता, सकारात्मक रिझल्ट्स मिळाले आहेत (Farmers Success Story).

नव्या विकसित केलेल्या काजूला मुबलक प्रमाणात येणार्‍या फुलोऱ्यांमध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अन्य जातीच्या काजूच्या रोपांच्या तुलनेत या संशोधित जातीमध्ये फळ धारणेचे प्रमाण अधिक आहे.

खते, फवारणीच्या खर्चामध्येही घट होणार आहे. शिवाय झाडाचे आयुष्यही जास्त असल्याचे अमर खामकर यांनी सांगितले. संशोधन यशस्वी झाले असून, कृषी विद्यापीठाच्या मान्यतेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले (Farmers Success Story).

  • लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून उत्पन्न
    ‘एकेआर’ या नवीन जातीच्या काजूची रोपे लागवडीपासून चौथ्या वर्षापासून उत्पन्नाला(Cashew Production) सुरुवात होते.
  • एकरी 70 झाडे बसतात, झाडाचे आयुर्मान 40 ते 50 वर्ष आहे.
  • दहा वषपिक्षा जास्त वयाच्या कलमाची 20 ते 50 किलोपर्यंत उत्पन्न देण्याची क्षमता आहे.
  • मधमाश्यांची पेटी बागेत ठेवली तरी मधाच्या उत्पन्नाबरोबर काजूचेही भरघोस उत्पन्न घेणे शक्य होते.
  • नव्या संशोधित जातीच्या रोपांच्या फुलोऱ्यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त असल्याने फुलोऱ्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काजूचे भरघोस उत्पादन शेतकर्‍याला मिळणार आहे.

नर्सरीमुळे सतत संशोधन (Farmers Success Story)
प्रयोगशील वृत्तीमुळे अमर खामकर हे सतत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांची स्वत:ची नर्सरी असून, त्यामध्ये त्यांचे संशोधन सुरू असते. कोकणात रेशीम शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी तर केलाच, शिवाय अन्य शेतकर्‍यांनाही करण्यास भाग पाडले. आर्थिकदृष्ट्या परवडणारी व उत्पादन अधिक देणारी शेतीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.