Farmers Success Story: तरुणाने तीन महिन्यात केली बेबी कॉर्न मक्यातून 80 हजाराची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक (Farmers Success Story) सध्या शेतकर्‍यांना खुणावत आहेत. असाच एक कमी कालावधीतील पिकाचा प्रयोग सांगली (Sangali) जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील, नरवाड येथे राहणाऱ्या सचिन आण्णासाहेब कुंभार (Sachin Kumbhar) या उपक्रमशील शेतकऱ्याने केला आणि यात त्याला चांगले यश सुद्धा मिळाले.  सचिन याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बेबी कॉर्न मक्याची लागवड (Baby Corn Farming) केली आणि यातून त्याने अवघ्या तीन महिन्यांत एक एकरात 80 हजार रूपयांचे उत्पन्न मिळविले (Farmers Success Story).

बेबी कॉर्न मक्यापासून (Baby Corn) चांगले उत्पन्न काढून शेती करणाऱ्यांसाठी सचिन कुंभार यांनी आदर्श निर्माण केला आहे (Farmers Success Story).

बेबी कॉर्न मक्याची लागवड कुठल्याही हंगामात करता येते. हे तीन महिन्यांत भरघोस उत्पादन देणारे नगदी पीक (Cash Crop) असून यासाठी लागणारा खर्चही कमी येत असल्याचे सचिन सांगतात.

पिकाचे व्यवस्थापन असे केले

बेबी कॉर्न मका काळ्या कसदार जमिनीत जोमाने येतो. तर हलक्या जमिनीत याचे उत्पादन अपेक्षित येत नाही. तरीही जिद्द व चिकाटीच्या जोरावर सचिन यांनी बेबी कॉर्नची लागवड करायचे ठरविले. यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. यामुळे पाण्याची व मजूरांची बचत झाली.

सचिन याने बेबी कॉर्न खरेदी करणाऱ्या कंपनी कडूनच एक किलोस 650 रुपये किलो दराने बियाणे खरेदी केले. एकरी 6 ते 7 किलो बियाणे खरेदी केले.

बेबी कॉर्नला लष्करी अळीचा (Army Worm) धोका असल्याने यावर प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची वेळेत फवारणी केली. याशिवाय युरिया खताची मात्रा दोन वेळा दिली.

बेबी कॉर्न मक्याला तुरा आला की कणसे काढली जातात. लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनंतर कणसे तयार होतात. एका बेबी कॉर्नच्या ताटाला किमान दोन कणसे लागतात. ही कणसे मोठमोठ्या हॉटेल मध्ये व शाकाहारात ग्रेवी बनविण्यासाठी वापरली जातात.

साधारणतः कणसाचे आकारमान एक इंच जाडीचे झाल्यावर कणसे काढली जातात. ही कणसे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी जागेवर येऊन घेऊन जातात. जागेवर बेबी कॉर्न मक्याला 8 रुपये किलो दराने खरेदी केली जाते (Farmers Success Story). या कंपन्या ही कणसे सोलून पॅकिंग करून याची निर्यात करतात. मिरज तालुक्यातील आरग येथे या कंपन्या कार्यरत आहेत.

मक्याची लागवड पशुपालनासाठी सुद्धा फायदेशीर
बेबी कॉर्न मक्याची कणसे एक आड दिवस पद्धतीने 5 ते 6 तोडे काढले जातात. दरम्यानच्या काळात मक्याला पाणी भरपूर द्यावे लागते. यानंतर या बेबी कॉर्न मक्याचा गुरांना चारा म्हणून चांगला फायदा होतो. या चाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे दूध वाढून गुरांची तब्येत सुधारली जाते. अशा या बहुगुणी मक्याची लागवड शेतकर्‍यांनी करून आपले राहणीमान उंचावावे (Farmers Success Story), असा सल्ला सचिन कुंभार यांनी दिला.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.