हॅलो कृषी ऑनलाईन: दारिद्र्य रेषेखालील शेतकर्यांसाठी (Ration Money For Farmers) राज्य सरकारतर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यातील (Marathwada) आत्महत्याग्रस्त (Farmers Suicide) 14 जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल- केशरी रेशन कार्डधारक) शेतकर्यांना (Farmers) रेशनसाठी दरमहा 150 रूपयांऐवजी आता 170 रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. 8 लाख कार्डधारकांना म्हणजेच एकूण 32 लाख शेतकर्यांना (Ration Money For Farmers) त्याचा फायदा होईल.
अन्य शेतकर्यांप्रमाणे या शेतकर्यांना सुद्धा पूर्वी तीन रुपये किलो तांदूळ, तर दोन रुपये दराने गहू दिला जात असे. मात्र, या योजनेत गहू, तांदूळ पुरवता येणार नाही, असे भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) 31 मे 2022 रोजी राज्य सरकारला कळविले.
त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील केशरी कार्डधारक शेतकन्यांना (Orange Card Holder Farmers) रेशन खरेदीसाठी दरमहा 170 रुपये देण्याची योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली. आता त्यात प्रत्येक लाभार्थीमागे 20 रूपयांची वाढ करून ही रक्कम 170 रुपये करण्यात आली आहे (Ration Money For Farmers).
आत्महत्याग्रस्त शेतकरी असलेल्या जिल्ह्यांमध्ये वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
वर्षाकाठी 652 कोटींचा अतिरिक्त भार
एका कुटुंबात किमान चार लाभार्थी असतात हे लक्षात घेता आठ लाख कार्ड धारकांच्या कुटुंबांतील 32 लाख जणांना अधिकची रक्कम मिळेल, या निर्णयामुळे राज्य सरकारच्या (State Government) तिजोरीवर आधी महिन्याकाठी 48 कोटी, तर वर्षांकाठी 576 कोटी रूपयांचा खर्च यायचा. आता महिन्याकाठी 54.40 कोटी आणि वर्षाकाठी 652 कोटी 80 लाख रुपये अतिरिक्त भार पडणार आहे (Ration Money For Farmers).