हॅलो कृषी ऑनलाईन: आज आपण अशा शेतकरी तरुणाबद्दल (Farmers Success Story) माहिती घेणार आहोत ज्याने तब्बल पंधरा एकरवर ढोबळी मिरचीची लागवड (Capsicum Farming) करून त्यातून लाखोंचा नफा कमावलाय Farmers Success Story.
सांगली (Sangali) जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील मनोज गाजी (Manoj Gaji) या तरुणाने प्रकाश रुकडे यांच्या शेतात सुमारे 15 एकर ढबू मिरचीची लागवड केली असून, त्यातून एकरी लाखांवर उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनोज गाजी यांनी ढबू मिरचीतून लाखो रुपयांचे अधिक उत्पादन (Capsicum Yield) घेतले होते (Farmers Success Story).
दूधगाव येथील मनोज गाजी हे 16 वर्षांपासून कृषी क्षेत्रात आहेत. प्रकाश रुकडे यांच्या शेतात त्यांनी 15 एकर ढबू मिरचीची 20 मार्च रोजी लागवड केली.
पिकाची लागवड करण्यापूर्वी शेताची उभी आडवी नांगरट करून शेणखत घातले.
त्यानंतर पाच फुटी सरीवर नागमोडी पद्धतीने (झिगझॅग) एकरी 14 हजार सिंजेंटा इंद्रा रोपांची लागवड केली.
शेतीला अत्याधुनिक ऑटोमायझेशन पद्धतीने ठिबकद्वारे पाणी तसेच एक दिवसआड पाणी व खताची फवारणी करण्यात येते.
रोग किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने नियमितपणे कीटकनाशके व अन्नद्रव्य खतांची फवारणी करण्यात येते (Capsicum Crop Management).
यावर्षी तापमान वाढ व रोगराईमुळे, दरातील चढ-उतारामुळे ढबू मिरचीची लागवड कमी झाली. ढबू मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून, तिसरा तोडा सुरू आहे.
दिल्ली, हैदराबाद, मुंबई व बेळगाव या ठिकाणी ढोबळी मिरची पाठवली जाते. सध्या या मिरचीला 60 रुपये किलो दर मिळत आहे. भविष्यात दर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एकरी एकूण 40 ते 50 टन उत्पादन अपेक्षित असून, एकरी 15 ते 20 लाख उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यांना रोहित ऐतवडे व मित्रांचे सहकार्य मिळत आहे (Farmers Success Story).
शेतकर्यांना मार्गदर्शन
मनोज गाजी व रोहित ऐतवडे यांनी ‘स्वस्तिक भाजीपाला ग्रुपच्या’ माध्यमातून आष्टा व परिसरातील शेतकर्यांना कृषी विषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यांचा भाजीपाला सध्या हैद्राबाद, बंगलोर, कलकत्ता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरात भाजीपाला पाठविला जात आहे, असे प्रगतशील शेतकरी (Farmers Success Story) मनोज गाजी यांनी माहिती दिली.