PM Micro Food Processing Scheme: सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करायचाय? जाणून घ्या माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात अन्नधान्याचे उत्पादन (PM Micro Food Processing Scheme) मोठ्या प्रमाणात होते. यातला बहुतेक शेतमाल किंवा अन्नधान्य यांना कमी भाव मिळतो किंवा खराब होऊन हा माल फेकण्यात जातो. यावर प्रक्रिया उद्योग हा चांगला पर्याय आहे. यामुळे अतिरिक्त मालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकर्‍यांना चांगला नफा मिळू शकतो.   

केंद्र शासनाच्या (Central Government) आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबवली जात आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याने चार पैसे जास्त कमावण्याची संधी उपलब्ध होत आहे.

काय आहे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना? (PM Micro Food Processing Scheme)

केंद्र सरकारने (Central Government Scheme) आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत केलेली ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PM Micro Food Processing Scheme) आहे. असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योग योजना आहे. यामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे (Raw Food Processing) उद्योग उभारता येतात.

धाराशीव (Dharashiv) जिल्ह्यात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. अनेक शिक्षित युवकांच्या हातांना रोजगार उपलब्ध होत नाही. मात्र, अनेकांकडे भांडवल नसल्याने उद्योगही उभारता येत नाही. आता केंद्र शासनानेच जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे.

या योजनेत (PM Micro Food Processing Scheme) बेरोजगारांसह बचत गट, शेतकरी गट (Farmers Group), संस्था आणि अ‍ॅग्रो कंपनीलाही (Agro Industry) अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, शासन एकूण कर्जावर 35 टक्के सबसिडी देणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही बेरोजगार आणि विविध संस्था व बचत गटांच्या सदस्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

कोणाला अर्ज करता येईल?

वैयक्तिक, बचत गट, शेतकरी गट, संस्था, अ‍ॅग्रो कंपनी यापैकी कोणालाही अर्ज करता येतो. सात बारा नसला तरी याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

शासनाकडून काय मदत मिळते?

शासनाकडून प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात यासाठी एका कर्मचार्‍याची मानधन तत्त्वावर नियुक्ती केली आहे. प्रस्ताव दाखल करण्यापासून तर मंजूरीपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाते. उद्योग मंजूर झाल्यावर व्यवस्थित चालवायला शासन 35 टक्के अनुदान देते.

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी करा अर्ज?

अन्नप्रक्रिया उद्योगातून (PM Micro Food Processing Scheme) शेतकर्‍यांना आर्थिक उन्नती साधता येते. या उद्योगासाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी अर्ज करू शकतात.

सध्या सुरू असलेले प्रक्रिया उद्योग

योजनेच्या (PM Micro Food Processing Scheme) अंतर्गत 2023-24 व चालू वर्षात जिल्ह्यात अनेक लोकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यापैकी काही उद्योग सुरूही झाले आहेत. यामध्ये खवा, बेदाणा, मसाला, पापड उद्योगांचा समावेश आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.