Farmers Success Story: आत्महत्या करायला निघालेला तरुण आज आहे प्रगतशील शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: एकेकाळी कष्टाने पिकवलेल्या अद्रकाला (Farmers Success Story) भाव मिळत नाही म्हणून थेट मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारा मराठवाड्याचा तरुण (Marathwada Farmer) कदाचित तुमच्यापैकी खूप जणांना आठवत असेल. हा तरुण आलेल्या परिस्थितीत स्वत:ला सावरत, मेहनतीच्या जोरावर बाजारातील बारकावे शिकून आज प्रगतीशील शेतकरी (Progressive Farmer) झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील आंतरवाली (खांडी) येथील कृष्णा दादाराव डोईफोडे (Krushna Doifode) यांनी वडिलोपार्जित असलेले साडे पाच एकर क्षेत्र, विविध फळ पिकांच्या उत्पन्नातून आज साडे तेरा एकरापर्यंत वाढवले आहे (Farmers Success Story). पूर्वीच्या एका विहिरीला आज 2 नव्या विहिरींची जोड देत मुबलक पाणी साठ्याकरिता एक शेततळे देखील कृष्णा यांनी बांधले आहे.

पदवीचे शिक्षण पूर्ण होताच 2011 साली वडीलांच्या दीर्घ आजारपणामुळे कृष्णा यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेतात सिंचनासाठी होती जेमतेम 20-25 फुट खोदलेली विहीर.

अशा परिस्थितीत पारंपरिक कपाशी, बाजरी आदी पिकांकडे वळण्याशिवाय पर्याय समोर नसतानाही कृष्णा यांनी धाडस करून तत्कालीन तेजीत असलेल्या अद्रक पिकाची लागवड (Ginger Farming) करण्याचे ठरवले. परिसरातील अद्रक उत्पादक शेतकर्‍यांना भेटून अद्रक शेतीची माहिती घेऊन कृष्णा यांनी एक एकर क्षेत्रावर अद्रक लागवड केली (Farmers Success Story).

विकतचं शेणखत, मशागत, लागवड, खते, कीटक नाशक औषधी आदी खर्च करत कृष्णा यांनी अद्रक पिकांचे व्यवस्थापन केले. उत्पादन ही चांगले मिळाले. मात्र बाजारात अद्रक विकण्याच्या वेळी भाव कोसळले. वडीलांच्या आजारपणामुळे आधीच असलेला कर्जांचा डोंगर (Crop Loan Interest) त्यात पुन्हा कर्ज, पीक निघल्यावर पैसे देऊ या वायद्यावर हातउसने घेतलेले खते आदींच्या कचाट्यात कृष्णा सापडले.

परिणामी आत्महत्येच्या (Farmer Was On The Way Of Suicide) वाटेवर जाण्याचा विचार त्यांनी केला. त्या आधी एकदा राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटून आपल्या परिस्थितीवर काही आर्थिक मदत मिळते का? या विचारांतून मंत्रालय गाठले. मात्र मंत्रालयात कोणत्याच मंत्र्याची भेट झाली नाही. तेव्हा आता इथून उडी मारू असा विचार सुरू असताना काही सजग नागरिकांनी कृष्णा यांना रोखले. पोलि‍सांच्या हवाली देत तिथून सुखरूप घरी पोहचवले (Farmers Success Story). 

तोवर सर्वत्र ही बातमी पसरल्याने परिसरातील चर्चेला उधाण आले होते. यातच एका कृषी साप्ताहिकाच्या पुढाकाराने व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने कृष्णा यांना शेतीत पुन्हा उभे करण्यासाठी काही योजनांचा लाभ मिळवून दिला गेला. ज्यात दीड एकर मोसंबी बाग दिली गेली. त्यातून कृष्णा सावरले. नकारात्मक विचार टाकून कष्ट आणि अथक परिश्रमातून पुन्हा कृष्णा उभे राहिले (Farmers Success Story). 

मोसंबी बागेत आंतर पिके घेत आज कृष्णा यांचा हा प्रवास साडे तेरा एकर क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे. सोबतच आज त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसून शेतात जाण्या येण्यासाठी दुचाकी, शेतमाल बाजारात विकण्यासाठी चारचाकी ओमनी गाडी आणि घर हे सर्व फक्त शेतीच्या उत्पन्नावर उभे केल्याचे कृष्णा अभिमानाने सांगतात (Farmers Success Story).

फळबागेतून साधली प्रगती (Progress From Fruit Orchard)

2012 मध्ये दीड एकर क्षेत्रावर न्यू सेलार जातीच्या मोसंबीची 15 बाय 15 अंतरावर लागवड केली. ज्यात ही पूर्ण बाग सरकारी योजनेतून होती. त्यानंतर मात्र पुढे 2020 मध्ये पुन्हा दीड एकर, 2021 मध्ये एक एकर, 2022 मध्ये एक एकर अशी आतापर्यंत साडे तीन एकर मोसंबीची लागवड केली आहे. सोबतच जुलै 2023 मध्ये 8 बाय 12 वर अंतरावर दीड एकर सीताफळाची लागवड देखील कृष्णा यांनी केली आहे. तर उर्वरित क्षेत्रावर पुढे वेगवेगळ्या फळबाग लागवडीचा त्यांचा विचार आहे (Farmers Success Story).     

आंतर पिकांनी दिली दमदार साथ 

मोसंबी लागवड केली पण उत्पादन मात्र 4 वर्षानी हातात येणार होते. कृषी विभागाच्या अधिकाराच्या सल्ल्यानुसार  त्यांनी मोसंबीत कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी यासारखी आंतरपिके (Intercropping In Mosambi) घ्यायला सुरुवात केली. यातून कृष्णा यांचा चांगला जम बसला आहे. या आंतरपिकांच्या मदतीने ते अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत चांगले उत्पन्न मिळवितात (Farmers Success Story).    

शेतीचे उत्पन्न (Farmers Success Story)

कृष्णा यांच्याकडे सध्या पाच एकर मोसंबी फळबाग, दीड एकर सिताफळ बाग, अर्धा एकर क्षेत्रावर शेत तळे आहे. तर उर्वरित क्षेत्रात ते कपाशी, बाजरी, गहू अशी पिके घेतात. सर्वत्र ठिबकचा (Irrigation) वापर असलेल्या फळबागेपैकी सध्या केवळ दीड एकर फळ बाग उत्पन्न देत असून इतर बागा असलेल्या शेतात आंतरपिके घेतली जातात. 

ज्यात एकरी 90-95 क्विंटल कांद्याचे उत्पादन सोबत मिरची, टोमॅटो मध्ये देखील कृष्णा चांगले उत्पादन घेतात. शेतीचा मजुरी, लागवड, बियाणे, किटकनाशक औषधी, आदी खर्च जाता वार्षिक 6 ते 7 लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे कृष्णा सांगतात (Farmers Success Story).