Fodder Management: दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होते का चाऱ्याची टंचाई? असे करा नियोजन आणि टाळा नंतरची घाई!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दरवर्षी पशुपालकांना (Fodder Management) उन्हाळ्यात (Summer) सतावणारा प्रश्न म्हणजे चाऱ्याचे टंचाई (Fodder Shortage). जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा व कोरडा चाऱ्याचे (Fodder Management For Dairy Cattle) नियोजन करून दूध उत्पादकांना हा त्रास वाचवता येईल. यासाठी खरीप हंगामापासूनच (Fodder Management In Kharif Season) नियोजन करणे गरजेचे असते. कारण उन्हाळ्यात हिरवा चारा (Green Fodder) सहज उपलब्ध नसतो आणि सरकी पेंड, चुणी, यासारख्या पशुखाद्याचे दर वाढलेले असतात. सर्वसामान्य पशुपालक आणि शेतकर्‍यांना हे परवडणार नसते.

अशावेळी नियोजन करणे गरजेचे असते. परंतु चाऱ्याचे नियोजन (Fodder Management) करताना नेमके काय करावे? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. तर त्यासाठीच आज आपण या लेखाच्या माध्यमातून चारा नियोजन जाणून घेणार आहोत. 

जनावरांची चाऱ्याची गरज

ज्या पशुपालकाकडे 10 गाई किंवा म्हशी आहेत, त्यांना एका जनावराला दिवसाला सरासरी प्रति जनावरं 6 किलो पशुखाद्य याप्रमाणे 60 किलो पशुखाद्य लागेल. म्हणजे 1800 किलो प्रति महिना. म्हणजे हेच प्रमाण 10 उत्पादकांचे गृहीत धरल्यास 18 टन प्रति महिना इतके पशुखाद्य लागेल. हेच प्रमाण चाऱ्याचे गृहीत धरल्यास 700 टन हिरवा चारा व सुमारे 200 टन कोरडा चारा लागेल (Fodder Management).

मुरघास (Silage) 

हिरवा चारा मुरघास स्वरुपात सुमारे एक वर्ष साठवता येतो (Fodder Management). यासाठी बंकर सायलेज, पीट सायलेज, बेलड सायलेजचा वापर करावा. काही ठिकाणी कोरड्या चाऱ्याला पर्याय म्हणून हाय फायबर पेलेट्सचा वापरही केला जातो. हिरवा चारा म्हणजे केवळ हिरवा मका या मानसिकतेतून शेतकर्‍यांनी आणि पशुपालकांनी बाहेर येणे गरजेचे आहे. जे शेतकरी वर्षभर हिरवा चारा लागवड करू शकतात. ते जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड वर्षभर करून चांगला व्यवसाय करू शकतात किंवा चाऱ्याचे मुरघास बनवून पुढील 12 महिने पर्यंत हिरवा चारा संपल्यावर त्याचा वापर करू शकतात.

कोरडा चारा (Dry Fodder)

कोरडा चारा म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप व उन्हाळी हंगामात घेतली जाणारी बाजरी उत्तम पर्याय आहे. बाजरी चार्‍याची (Bajara Fodder) कुट्टी करून ती साठवून ठेवल्यास दीर्घ काळ उपयोगात येऊ शकते. तसेच बाजारीचे पीक अनेक भागात मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने कमी खर्चात देखील उपलब्ध होऊ शकणारा चारा म्हणून बाजरी योग्य पर्याय आहे. 

अशा पद्धतीने नियोजन (Fodder Management) करून भविष्यातील चारा टंचाई वर मात करता येऊ शकते. ज्यासाठी केवळ योग्य नियोजनाची गरज आहे.