हॅलो कृषी ऑनलाईन: पिकांना खते (Fertilizer Application) ही लागवडीपासून ते वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत द्यावी लागतात. पिकांच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते. त्यानुसार खताचे व्यवस्थापन (Fertilizer Application) करणे फायदेशीर ठरते.
मृदा परीक्षणानुसार (Soil Testing) पिकांना खते देण्याची शिफारस करण्यात येते (Fertilizer Recommendation). यामध्ये स्फुरद पालाशयुक्त खते पिकास उपलब्ध होण्यास वेळ लागतो, त्यामुळे संपूर्ण मात्रा पिक पेरणीच्या वेळेस द्यावी, तसेच आवश्यकता असल्यास त्यांच्या विद्राव्य स्वरुपातील खतांची वेळ फुलोर्याची वेळ, दाणे भरणे वेळेस विद्राव्य खताच्या फवारणीचे अधिक फायदे होतात. नत्रयुक्त खताचा ऱ्हास लवकर होत असल्यामुळे त्यांची आवश्यकतेनुसार दोन ते तीन भागात विभागणी करून त्याची मात्रा पिकात द्यावी (Fertilizer Application).
खतांची निवड (Fertilizer Application)
खरीप पिकांसाठी (Kharif Crop) मातीचा प्रकार (Soil Type) व पीक यानुसार खताची निवड करावी. माती तपासणीमुळे जमिनीची सुपीकता व गुणदोष याबाबतची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, विद्राव्य क्षारांचे प्रमाण इ. नुसार कोणत्या अन्नद्रव्यांची किती गरज आहे. यांचे प्रमाण ठरवता येते म्हणजेच जमिनीचे आरोग्य समजते. बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. परंतु कोणत्या खतांमध्ये कोणत्या अन्नद्रव्याचे किती प्रमाण व ते कोणत्या स्वरुपात आहे हे पाहून आपल्या पिकासाठी व जमिनीसाठी योग्य आहे का हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे केलेला खतांचा वापर मूलभूत शिफारशीपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो व अनावश्यक खतांचा वापर टाळता येऊ शकतो.
जमीन आणि पिकांनुसार खालील प्रमाणे करा खतांचा वापर (Fertilizer Application According To Soil And Crops)
• पाणी साचलेल्या जमिनीत नायट्रेटयुक्त खते (Nitrate Fertilizers) होत नाही.
• ज्या जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट या सारख्या गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर करावा
• डाळवर्गीय व गळीत पिकांमध्ये गंधकाची आवश्यकता जास्त असते अशा पिकास गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर जास्त करावा.
• क्षारयुक्त जमिनीत (Saline Soil) युरीया वापरल्यास त्याचे नायट्रेटमध्ये रुपांतर होण्यास विलंब लागतो, परंतु नायट्रेट जमिनीत राहिल्यास पिकास अपायकारक ठरतो. म्हणून अशा जमिनीत युरिया ऐवजी अमोनियम नायट्रेट वापरावे (Fertilizer Application).
• आम्लयुक्त जमिनी (Acidic Soil) सोडून इतर जमिनीत पाण्यात विद्राव्य असलेल्या स्फुरदयुक्त खते वापरावीत. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट.
• माती तपासणी अहवालात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास शिफारसीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा सुध्दा द्यावी कारण ही अन्नद्रव्ये सुध्दा मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याइतकीच महत्त्वाची असतात (Fertilizer Application).