Success Story: फुलांच्या आकर्षणातून गुलाब शेतीकडे वळणारी उच्चशिक्षित महिला शेतकरी!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: फूलं सर्वांनाच आवडतात. येता जाता (Success Story) फुलांचे गुच्छ नजरेस पडले तरी प्रसन्न आणि आनंदी वाटते. परंतु फुलाचे आकर्षण असल्यामुळे नोकरी सोडून फुलशेतीत (Flower Farming) रमणारे कदाचित तुमच्या ऐकण्यात आले नसेल. आज आम्ही अशाच एका तरुणीची (Woman Farmer) यशोगाथा सांगणार आहोत जिने 8 वर्षापूर्वी पुण्यातील नामवंत कंपनीत एचआर पदाची नोकरी सोडून गुलाबाची शेती (Rose Farming) करायला सुरुवात केली (Success Story).

या तरुणीचे नाव आहे हर्षदा सोनार (Harshada Sonar). 8 वर्षापूर्वी पुण्यातील नामवंत कंपनीत एचआर नोकरीला असताना येता-जाता विक्रेत्यांकडे गुलाबाची फुले दिसायची. ते पाहून तिचे गुलाबाकडे आकर्षण वाढत गेले. मग तिच्या मनात फुल लागवडीपासून  ते काढणी पर्यंतचे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्व प्रश्नासाठी तिने गुगलकडे गुलाबाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली (Success Story).

माहिती गोळा करताना हर्षदा यांचा गुलाबाबद्दलचा उत्साह अजून वाढला. मग तिने पती मार्फत मावळ आणि तळेगाव येथील गुलाब उत्पादकांची भेट घेऊन शेतीचे मार्गदर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुलाब लागवडीपासून ते गुलाब काढणी याबद्दलची सविस्तर माहिती घेतली. आणि गुलाब शेतीला 2016 पासून सुरुवात केली.

20 गुंठ्यापासून गुलाब शेतीला सुरुवात

हर्षदाने शिक्रापूर येथे वीस गुंठे आकाराचे पॉलिहाऊस (Rose Polyhouse) भाड्याने घेऊन शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला तिला शेतीबदल काहीच माहित नसल्याने आणि काम करणारे कामगार देखील नव्याने असल्याने तिला अनेक अडचणी आल्या. सगळ्याच गोष्टी त्यांनी तज्ज्ञांना विचारून करावे लागायचे. स्वतः कामगाराबरोबर ती शिकत गेली. झाडांना खत कसे आणि किती द्यायचे? कीटकनाशक आणि इतर औषधे कशी फवारायची? झाडांचे कटींग, बेडींग कसे करायचे? अशा सगळ्या पद्धती शिकून उत्तम नियोजन केले. शेतीविषयक काहीच ज्ञान नसल्याने प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देत होती (Success Story).

फुल नियोजन कसे आहे?

एक गुलाबाच फुल तोडले की त्या जागेवर दुसरे फुल येण्यास साधारण 40 दिवस लागतात. मग त्याप्रमाणे लग्नसराईत दिवाळी, व्हॅलेंटाईन अशा वेगवेगळ्या हंगामात वातावरण बघून नियोजन करायला सुरुवात केली, आणि त्याप्रमाणे झाडांचे कटींग, बेंडींग, क्लीपींग, खतांचा डोस कमी जास्त करणे अशा विविध गोष्टीचे नियोजन (Success Story) हर्षदा करते. वातावरणाचाही सगळा अभ्यास करावा लागतो असे सुद्धा हर्षदा सोनार सांगते.

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ

शिक्रापूर येथे 4 वर्ष गुलाब शेती केल्यावर कोरोनानंतर खेड-शिवापूर येथे एक एकर पॉलीहाऊस घेऊन आता 3 वर्ष ती शेती करत आहे. पॉलिहाऊसचे भाडे महिना 30 हजार रुपये आहे. कामगारांचे पगार, खत, कीटकनाशक असे सगळे मिळून महिना 85 ते 90 हजार रुपये खर्च आहे. यामुळे वर्षातील कमी जास्त भावांची सरासरी काढली तर प्रति महिना 1 लाख 25 हजारांपर्यंतचे उत्पन्न हर्षदा सोनार यांना मिळते (Success Story).

त्यांच्या गुलाबाची प्रत नेहमीच चांगली असल्यामुळे फुले त्यांच्या नावावरच पुण्याच्या होलसेल मार्केट मध्ये चांगल्या दरात विकली जातात. काहीजण थेट  पॉलिहाऊस मधूनच खरेदी करतात. फुलांचे डेकोरेशन आणि बुके यांच्या ऑर्डरही स्वीकारल्या जातात (Success Story).

फुलांचा रेट आवक आणि मागणीनुसार रोज बदल असतो. यामुळे दरात चढ-उतार होत असते. 20 फुलांचा एक गुच्छा असतो. याची कमीतकमी किंमत 30 रुपये ते जास्तीत जास्त 300 रुपये इतकी असते. पॉलीहाऊस मधून रोज 800 ते 1200 फुलांची काढणी होते (Success Story). गणपती उत्सवापासून व्हॅलेंटाईनच्या आठवड्यापर्यंत गुलाबाला चांगली मागणी असते. तर इतर महिन्यात कमी मागणी असते त्यामुळे दर कमी जास्त होत असतात.

व्हॅलेंटाईन आठवड्यात गुलाबाला चांगली मागणी असते, आणि दरही चांगला मिळतो (Success Story).

शेतकर्‍यांनी मार्केट दर बघून आपले उत्पादन वाढवले किंवा कमी केले पाहिजे. तसेच शेतीकडे होणार्‍या खर्चावर देखील लक्ष दिलं पाहिजे. यामुळे शेती उत्पादन करताना होणारे नुकसान आपण आटोक्यात आणू शकतो. याचबरोबर सेंद्रिय खताचीही वापर केल्यास खताना लागणारा खर्च कमी होतो, असेही हर्षदा सांगतात (Success Story).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.