Keeda Jadi Mushroom: 2 लाख रुपये प्रति किलो दराने विकली जाते मशरूमची ‘ही’ जाती; लागवड केल्यास व्हाल करोडपती!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी अनेक प्रकारच्या मशरूमची (Keeda Jadi Mushroom) लागवड करतात, ज्याची किंमत प्रति किलो 250 ते 500 रुपये आहे. याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना भरपूर नफाही मिळत आहे. पण, आज आम्ही अशा प्रकारच्या मशरूमबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत हजारो नाही तर लाखो रुपये आहे. या जातीच्या मशरूमची लागवड (Mushroom Cultivation) सुरू करून एखादी व्यक्ती करोडपती सुद्धा बनू शकते. विशेष म्हणजे शेतकरी या मशरूमची लागवड लॅबमध्ये करू शकतात. आम्ही ज्या मशरूम बद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे ‘कीडा जडी’ मशरूम. या मशरूमचे शास्त्रीय नाव कॉर्डिसेप्स सायनेन्सिस असून हे यारसागुंबा (Keeda Jadi Mushroom) वाया नावाने सुद्धा ओळखले जाते

‘कीडा जडी’ मशरूमचे फायदे आणि उपयुक्तता (Keedajadi Uses)

कीडा जडी मशरूममध्ये (Keeda Jadi Mushroom) अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हा मशरूम कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार आणि श्वसनाच्या गंभीर आजारांवर देखील उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वे मिळतात. यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि चमकदार राहते. हा मशरूम एक शक्तिशाली ऊर्जा बूस्टर म्हणून कार्य करते. त्याचा वापर विशेषतः पंचतारांकित हॉटेल्स आणि व्हीआयपी लोक करतात. हा मशरूम केशरसारखा दिसतो. आणि पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग पिवळा होतो. याचा उपयोग ऊर्जा वाढवणारे पेय म्हणून केला जातो. त्यामुळेच बाजारात या मशरूमचा दर (Keeda Jadi Price) दोन लाख रुपये किलो आहे.

कीडा जडी मशरूम महाग का आहे? (Most Expensive Mushroom)

हे मशरूम (Keeda Jadi Mushroom) महाग असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची मर्यादित उपलब्धता. एका अंदाजानुसार आशिया खंडात या मशरूमचा व्यवसाय अंदाजे 200 कोटी रुपयांचा आहे. हा एक जंगली मशरूम आहे. त्याची कमी उपलब्धता आणि मोठ्या संख्येने ग्राहक यामुळे त्याचा दर खूपच जास्त आहे. हे अनेक रोगांवर जीवनरक्षकासारखे काम करतात. यामुळेच जगभरातील मोठे खेळाडू आणि पैलवान या मशरूमची भाजी आवडीने खातात. काही लोकांचा असा विश्वास आहे की ही भाजी खाल्ल्याने इंग्रजी औषधे आणि रसायनांचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यात असे औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Keeda Jadi) आहेत, जे आपल्याला शक्तिशाली बनवतात.

कीडा जडी मशरूमची लागवड कुठे आणि कशी करतात

वास्तविक, या मशरूमची लागवड फक्त चीन आणि तिबेटच्या थंड भागात केली जाते. ही जगातील सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाते. मशरूमची ही जात कृमीद्वारे वाढविली जाते, म्हणूनच याला कीडा जडी मशरूम (Keeda Jadi Mushroom) असेही म्हणतात

परंतु लॅबमध्ये योग्य वातावरण निर्मिती करून सुद्धा या मशरूमची लागवड करता येते. श्री गंगानगर येथील तरुण शेतकरी डॉ. चरण सिंह यांच्या मते, या मशरूमच्या लागवडीसाठी 10 x 10 खोलीची आवश्यकता आहे. ही खोली प्रयोगशाळा म्हणून वापरली जाऊ शकते. शेतकऱ्यांना ही प्रयोगशाळा विभागणी करावी लागते. ही प्रक्रिया महागडी असली तरी शेतकऱ्याला त्यात सात ते आठ लाख रुपये गुंतवावे लागू शकतात. कारण त्याच्या लागवडीसाठी खूप आवश्यक उपकरणे लागतात.

उत्पन्न

हे मशरूम (Keeda Jadi Mushroom) पीक वर्षातून 4 वेळा काढले जाऊ शकते. 10 x 10 च्या खोलीतून दर तीन महिन्यांनी 5 किलो पीक घेतले जाते. अशा प्रकारे, या मशरूमचे एकूण 20 किलो वार्षिक उत्पादन होऊ शकते.

कमाई

या शेतीमध्ये प्रयोगशाळेत 3 महिन्यांत 5 किलोपेक्षा जास्त मशरूम तयार करता येतात. अशा प्रकारे अवघ्या तीन महिन्यांत 10 लाख रुपयांची कमाई होते. या मशरूमची वर्षातून 4 वेळा काढणी करता येते. अशा प्रकारे एकूण 40 लाख रुपयांची कमाई होईल.

डॉ चरणसिंग यांचे यश

बायोटेक्नॉलॉजीचे प्राध्यापक, डॉ. चरण सिंग यांनी श्रीनगरमध्ये 8000 मीटर उंचीवर कीडा जडी मशरूम उगवण्याचा विक्रम केला आहे. त्यांच्याकडून या मशरूमच्या (Keeda Jadi Mushroom) लागवडीचे प्रशिक्षण घेऊन दूरदूरचे अनेक शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहेत.