हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे. आज (दि. 1 ऑक्टोबर) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर येथे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याचा अंदाज आहे, हवामान खात्याने वर्तविला आहे.
ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Monsoon)
राज्यात हवामान कोरडे असून उकाड्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याची, शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकणात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच 115 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.