लागवडीच्या वासरांच्या जलद वाढीसाठी द्या ‘काफ स्टार्टर’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अनेक पशुपालक गाय म्हैस तयार करण्यासाठी वासरांचे चांगल्या प्रकारे संगोपन करतात. वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसर वापरलं जातं. त्याचा वासरांच्या वाढीमध्ये मोठा फायदा होतो पण मिल्क रिप्लेसर बरोबरच जर काफ स्टार्टरचा वापर सुरू केला तर ते त्यांच्या जलद वाढीसाठी मदत करते आणि वासरांना सगळी पोषण तत्व पुरवत असते.

काफ स्टार्टर म्हणजे काय?

आता काफ स्टार्टर म्हणजे नक्की काय? तर काफ स्टार्टर म्हणजे वासरांकरिता करिता वापरला जाणारा घन स्वरूपातील पोषणयुक्त खुराक. कफ स्टार्टर देण्याची योग्य वेळ म्हणजे वासरांच्या वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते चार महिन्यांपर्यंत आहे. सुरुवातीच्या काळात काफ स्टार्टर ची मात्राही कमी असावी नंतर हळूहळू ती वाढवली जाते. सुरुवातीच्या काळात अगदी शंभर ग्राम पासून सुरुवात करावी आणि नंतर एक ते दीड किलोपर्यंत काफ स्टार्टर तुम्ही वासरांना देऊ शकता. यामध्ये कडधान्य व पेंडी, भुसा, प्राणिजन्य प्रथिने युक्त पदार्थ, जीवनसत्व, क्षार, प्रतिजैविके या घटकांचा स्टार्टर बनवण्यात समावेश असतो.

काफ स्टार्टर मध्ये असलेले घटक

काफ स्टार्टर मध्ये 22 ते 26 टक्के प्रथिने असतात. चार टक्के स्निग्ध पदार्थ, सात टक्क्यांपर्यंत तंतुमय पदार्थ,ऍसिड इन्सोल्युबल ऐश 2.5%, आयोडीनयुक्त मीठ एक टक्का, कॅल्शिअम व फॉस्फरस 0.5% हे कमीत कमी असतं. काफ स्टार्टर मध्ये A, D3, E या जीवनसत्त्वांचा समावेश असतो.
त्याचबरोबर अल्फा टॉक्सिन बाईंडरचा देखील समावेश असतो. वासरांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या आहारामध्ये या सर्व घटकांचा समावेश असणं गरजेच आहे त्यातल्या त्यात प्रथिनांचा वापर असणं अत्यंत गरजेचं आहे.

अमिनो आम्ल हे शरीरातील स्नायूंची झपाट्याने वाढ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरात अमिनो आम्लं अत्यंत महत्त्वाचे काम करत असते. लहान वासरां मध्ये प्रथिनांची गरज हे खूप जास्त असते. जसे जसे त्यांचे वय वाढते तसतशी प्रथिनांची गरज कमी होत जाते. जन्म झाल्यावर वासरांमध्ये लगेच काठी पोटाची वाढ झाली नसल्याने त्यांच्या आहारात जास्तीत जास्त उपलब्धता असणाऱ्या प्रथिनांचा समावेश करणं गरजेचं असतं. नर व मादी वासरांची वाढ ही तीन महिन्यांपर्यंत सारखी होत असते परंतु तीन महिने झाल्यावर मादी वासरांची वाढ नर वासरांच्या तुलनेत कमी होते. काफ स्टार्टर बनवण्यासाठी जर तुम्ही खाद्य घटकांची निवड करणार असाल तर त्या घटकांची त्या पदार्थांमधील पोषक तत्वांचे प्रमाण हे लक्षात घ्यायला हवे. काफ स्टार्टर हे एक गोळी किंवा कांडी पेंडेच्या स्वरूपात असते.

— काफ स्टार्टर बनवताना तीन ते पाच टक्क्यांपर्यंत मळीचा वापर केला तरी चालतो.
–जर तुम्ही गोळी युक्त काफ स्टार्टर चा वापर करणार असाल तर त्यामुळे काठी पोटातील द्रावणाचा सामू कमी होण्याची शक्यता असते सामू कमी झाल्यानं आम्लधर्मीय पदार्थाचं पचन झाल्याचं दिसून येते.
— जर तुम्ही काफ स्टार्टर चा वापर चालू केला आणि तुमचे वासरू हे चांगल्या प्रकारे काफ स्टार्टर खाऊ लागले तर त्याचे प्रमाण हे एक ते दीड किलोपर्यंत वाढ वावे त्यानंतर तुम्ही वासराला आईपासून दूर करण्याची प्रक्रिया चालू करू शकता.