हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाने डाळी, कडधान्य व्यापारावरील निर्बंध आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलाच्या धोरणा विरोधात सांगली मार्केट यार्डातील व्यापार बंद ठेवले. सर्व शेतीमालाचे व्यवहार बंद असल्याने आठ ते दहा कोटींची उलाढाल प्प झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान व्यापार्यांनी चेंबर ऑफ कॉमर्ससमोर निदर्शने करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली शासनाने डाळी, कडधान्य यावरील साठा मर्यादा आदेश काढले आहेत.
डाळी व्यापार करणार्या घाऊक किरकोळ व्यापार्यांना शासनाने निर्धारित केलेल्या स्टॉक पोर्टलवर या वस्तुची माहिती सादर करणे. या वस्तूच्या स्टॉकबाबत मर्यादानुसार व्यापार करणे अनिवार्य केले आहे. डाळी या वस्तू सर्वसामन्य नागरिकांच्या दैनंदिन सेवनाच्या वस्तू आहेत. डाळी कडधान्य या जीवनावश्यक वस्तूवरील साठा मर्यादा आदेशास व्यापारी, कारखानदार याचा तीव्र विरोध आहे. यामुळे डाळीचा पुरवठा कमी होऊन उलट भाववाढ होईल, अशी भीती निर्माण झाली आहे.
डाळीचे उत्पादन करणार्या शेतकर्यांनाही अडचणीची ठरणार आहे. डाळी कडधान्यावरील साठा मर्यादा निर्बंध त्वरित उठवावेत अशी मुख्य मागणी आहे. या आंदोलनाला यार्डातील व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. गूळ, हळद, बेदाणा, आदि शेतीमालाचे सौदे बंद राहिल्याने यार्डातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तातडीने योग्य असा निर्णय घेऊन व्यापार्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.