हॅलो कृषी ऑनलाईन: कोकणातल्या काही भागात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात गेल्या 24 तासात 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 1 जून ते 19 जुलैपर्यंत सरासरी ४१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात पाऊस ४८८ मिलिमीटर नोंद झाली आहे अर्थात नाशिक 70 टक्के पुणे 85% विभागात अद्याप कमी पाऊस आहे.
सध्याचा पाऊस दिलासादायक
कृषी खात्याच्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेला पाऊस एकूण हंगामासाठी दिलासादायक आहे. त्यामुळे काही भागात रखडलेल्या पेरण्या होतील. खरिपाचा अजूनही 20% पेरा बाकी आहे. दमदार पावसामुळे भाताच्या पुनर्लागवडीची कामे वेगाने पुढे सरकतील. राज्यात भाता खाली सरासरी पंधरा लाख हेक्टर क्षेत्र आहे मात्र लागण साडेपाच लाख हेक्टरपर्यंत झाली आहे. म्हणजेच अजून 70 टक्के लागण बाकी असल्यामुळे भातासाठी भरपूर पावसाची गरज आहे. भात पट्ट्यात अनेक ठिकाणी अद्याप लागवड सुरू आहे.
दरम्यान राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असताना त्या बदल्यात काही भागांमध्ये कपाशीचा पेरा मात्र घटत आहे. मात्र मराठवाड्यातील पारंपारिक खरीप ज्वारी आणि बाजरी चे क्षेत्र घटनेची चिन्ह आहेत. या दोन्ही पिकांची जागा काही गावांमध्ये हळूहळू सोयाबीन घेऊ पाहत असल्याचे दिसून येत आहे असं निरीक्षण राज्याच्या कृषि विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी नोंदवले आहे.याबाबत एका कृषी दैनिकाशी बोलताना पाटील म्हणाले राज्यात खरीपाचा पेरा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यात दहा दिवसात राज्यभर धानाची पुनर्लागण संपुष्टात येईल.
सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
सर्वत्र पाऊस चांगला असल्यामुळे सध्या तरी हंगामाची चांगली स्थिती दिसत आहे सोयाबीन लागेल या हंगामात चांगला दर मिळाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन वर जास्त लक्ष केंद्रित केला आहे त्यामुळे इतर कोणत्याही पिकापेक्षा यंदा सोयाबीनचा सर्वाधिक पेरा राज्यात राहील असेही त्यांनी म्हटले आहे