हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन नंबरच्या कांद्याला दहा किलोसाठी 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसुन येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थीर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
जुन्नर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला 20 रुपयांचा दर मिळाला असला तरी शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
कांद्यासाठी योग्य नियोजन महत्वाचे
राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आलंय.
भाजीपाला पिकात कांदा हे पिक शेतकरी दष्ट्या महत्वाचे नगदी व निर्यातयोग्य मसाला पीक आहे. कांदा भारतीय लोकांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जागतिक स्तरावरील भाजीपाला पिकाचा क्षेत्रविस्तार लक्षात घेता कांदा हे दुस-या क्रमांकाचे पीक आहे. कांदा हे मुख्यत थंड (हिवाळी) हंगामातील पिक जरी असले मात्र हे खरीप, रांगडा आणि रब्बी या तीन टप्प्यात कांद्याचे पिक घेतले जाते.