चिंताजनक ! देशात 20% दुष्काळाची शक्यता ; स्कायमेटचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पावसाचा हंगाम सुरु झाल्यापासून सतत पावसाची अनियमितता पाहायला मिळत आहे. पाऊस कधी जोरदार तर कधी पाऊस पूर्ण गायब होतो आहे. खरे पाहता सध्या चांगला पाऊस व्हायला होता मात्र प्रत्यक्षात पाऊस गायब झाला आहे.  ऊन पडायला सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर देशावर २० % दुष्काळाचं सावट असल्याची माहिती स्कायमेटने वर्तवली आहे. ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबर मध्ये देखील पाऊस पाठ फिरवण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

सप्टेंबर मध्ये २० टक्के दुष्काळ राहण्याची शक्यता स्कायमेट कडून वर्तवण्यात आली आहे. तर पाऊस सामान्य राहण्याची ६० टक्के शक्यता स्कायमेट कडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र अजून भर पडली आहे. सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता २० टक्के आहे तर सामान्य पेक्षा कमी पावसाची शक्यता २० टक्के इतकी वर्तवण्यात आली आहे.

मान्सून हा (-६) टक्के जाण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यापूर्वी मान्सून सामान्य असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता स्कायमेटच्या तज्ज्ञांकडून मान्सून सामान्य पेक्षा भीती व्यक्त करण्यात येत आहे.