Drought : राज्यातील नवीन 224 मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर; वाचा.. जीआर!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 मध्ये दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी, ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. अशा राज्यातील १९ जिल्ह्यांतील नव्याने स्थापित २२४ मंडळांमध्येही राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या नव्याने स्थापित मंडळांमध्ये सरकारच्या दुष्काळी (Drought ) सवलती लागू तातडीने लागू करण्यात याव्यात. याबाबत राज्य … Read more

Flood Management : दुष्काळी मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी; 4000 कोटींचा निधी मंजूर!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती (Flood Management) निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार … Read more

Drought : देशातील 25 टक्के भाग दुष्काळाच्या विळख्यात; नोआच्या अहवालातून माहिती समोर!

Drought Affected By Country

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भारतातील 25 टक्के भाग हा दुष्काळाचे (Drought)चटके सहन करतो आहे. नोव्हेंबर महिन्यात ही टक्केवारी 26 टक्के इतकी होती. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये झालेल्या पावसामुळे याची नोंद 25 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. असे अमेरिकी हवामान संस्था नोआने (नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) म्ह्टले आहे. … Read more

Sharad Pawar : शेतकऱ्यांविषयी मोदी सरकारला अजिबातही कळवळा नाही – शरद पवार

Sharad Pawar On Modi Government

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात (Sharad Pawar) सापडलाय. एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकऱ्याला घेरले आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत केंद्रातील मोदी सरकारला अजिबातही आस्था किंवा कळवळा राहिलेला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. … Read more

Drought : ‘या’ राज्यातील दुष्काळग्रस्तांना मिळणार 1000 कोटी रुपये!

Drought 1000 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासोबतच शेजारील कर्नाटक राज्य आणि झारखंडमध्येही दुष्काळाची (Drought) स्थिती आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत राज्यातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 475 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्कम वितरित केली आहे. त्याद्वारे कर्नाटकातील केवळ 20 लाख शेतकऱ्यांनी आपला पीक विमा अर्ज भरला आहे. त्यामुळे आगामी काळात उर्वरित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांची पीक … Read more

Drought : दुष्काळग्रस्तांना प्रत्येकी 3500 रुपये; ‘या’ राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांना फायदा!

Drought In Jharkhand

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी (Drought) परिस्थिती असून, त्या-त्या राज्यांकडून सध्या शेतकऱ्यांना आपआपल्या पातळीवर मदत दिली जात आहे. अशातच आता झारखंड सरकारकडून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला 3500 रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील ज्या-ज्या शेतकऱ्यांची पिके ही 33 टक्क्यांपर्यंत खराब झाली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी, असे … Read more

Flood Management : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र पाणीदार होणार; पूर व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली या भागात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र या भागातील पूर व्यवस्थापन (Flood Management) करून पावसाळ्यातील हे पाणी दुष्काळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वळवले जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पाला जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता 3300 कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Drought : राज्यातील नवीन स्थापित महसूल मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 मध्ये दुष्काळसदृश (Drought) परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी, ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत. तसेच ज्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेली नाहीत. अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती (Drought) जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अशी माहिती मदत, पुनर्वसन … Read more

Drought : पीक कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Drought Postponement of Crop Loan Recovery

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या भागांमध्ये देखील ही स्थगिती राहणार … Read more

Drought : दुष्काळ पडावा ही तर शेतकऱ्यांचीच इच्छा; सहकारमंत्री बरळले!

Drought Desire Of Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची इच्छा असते की वारंवार दुष्काळ (Drought) पडावा, कारण त्यामुळे त्यांना सरकारकडून कर्जमाफीचा लाभ मिळतो. असे वादग्रस्त विधान कर्नाटक सरकारमधील सहकार व पणनमंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस शासित सरकार असून, भारतीय जनता पक्षाने पाटील यांच्या या विधानाला असंवेदशीलतेचे आणि बेजबाबदारपणाचे लक्षण म्हटले आहे. पाटील यांच्या या … Read more

error: Content is protected !!