हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील कीडनाशक विक्री करणाऱ्या दुकानात मालाचे साठे नोंदवण्यासाठी संगणक प्रणाली वापरण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जुनाट नोंद व यांच्या प्रतीवर वर्षानुवर्ष विसंबून असलेल्या विक्रेत्यांना डिजिटल नोंदी बाळगण्याचा उत्तम पर्याय आता मिळाला आहे.
केंद्रांना 1971च्या कीडनाशक नियमातील पंधराव्या तरतुदीत सुधारणा केली आहे. या सुधारणा नुसार देशातील कोणताही विक्रेता आता कीडनाशकांचा साठा नोंद ठेवण्यासाठी हस्तलिखित व यांबरोबरच संगणकीय प्रणालीचा देखील वापर करू शकणार आहे तशी अधिसूचना कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अश्विनी कुमार यांनी जारी केली आहे.
कीटकनाशकांच्या नोंदी संगणकीय पद्धतीने घेण्यास कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे केवळ विक्रेतेच नव्हे तर कीडनाशके व कच्च्या मालाची आयात करणाऱ्या संस्था उत्पादक कंपन्या आणि वितरक यांची देखील हस्तलिखित नोंदीच्या किचकट कामापासून सुटका होणार आहे. संगणकीय साठे नोंदणी जतन करण्यास सोयीस्कर ठरेल सरकारी यंत्रणेला तपासणी करण्याच्या प्रक्रियेत हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या समोर निविष्ठा विक्रेत्यांच्या संघटनांनी मांडलेल्या मुद्यांवर हा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. संगणकीय नोंदी कायदेशीर ठरवणारा या निर्णयाचे ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनमोहन कळंत्रे, प्रवीण भाई पटेल, महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड असोसिएशन अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सत्यनारायण कासट यांनी स्वागत केले. देशभरातील जवळपास एक लाख विक्रेत्यांना या निर्णयाचा फायदा होईल असे या संघटनांनी स्पष्ट केला आहे.