हॅलो कृषी ऑनलाईन : हवामानाच्या सततच्या बदलामुळे यंदाचे खरिपाचे पीक धोक्यात राहिले आहे. असे असतानाही पिकातून अधिकचे उत्पन्न कसे घ्यायचे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. मध्यंतरीच रब्बी हंगामाच्या अनुशंगाने राज्यात शेतीशाळा ह्या घेतल्या जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे खरिप हंगामातील शेतीशाळा ह्या पार पडत आहेत. यातून शेतकऱ्यांना आहे त्या पिकातून अधिकचे ऊत्पन्न कसे मिळवायचे याचे धडे दिले जात आहेत.
काय घ्यावी काळजी
— शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करताना योग्य झाडांची करणे
— इतर जातीचे वाण हे वेगळे ठेवणे शिवाय सोयाबीनचे दोन ढीगारे लावून शेंगाच्या प्रतिनुसार वर्गवारी करणे आवश्यक आहे.
–शेंगामधील हिरवी व सुरकत्या पडलेली बियाणे ही चांगल्या सोयाबीनाध्ये मिसळल्यात शेतकऱ्यांना कमी भाव मिळेल.
–अशा बारीक बाबींचा विचार करुन सोयाबीनची काढणी आवश्यक आहे.
सोयाबीन काढताना अशी घ्या काळजी
–सोयाबीन काढताना त्याची कांद्याप्रमाणे वर्गवारप करावी
— चांगल्या सोयाबीनमध्ये जर हिरव्या शेंगा व सुरकुत्या पडलेले बियाणे मितळले तर चांगल्या सोयाबीनला अपेक्षेप्रमाणे भाव मिळणार नाही.
–त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्या ती काळजी घेणे आवश्यक आहे.
–साठवूण ठेवलेल्या सोयाबीनला कर फूटु नये म्हणून शेतामधून चर काढून देणे आवश्यक आहे.
–पाण्याचा निचरा करुन साठवलेल्या ठिकाणी हवा खेळती ठेवण्याचा सल्ला बीडचे आत्मा प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांना शेतकऱ्यांना दिला आहे.
सध्या काही सोयाबीनची काढणी ही सुरु आहे तर उशीरा पेरा झालेल्या सोयाबीनच्या काढणीला अजूनही 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आता सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन दिले जात असले तरी खर्चाने मेटाकूटीला शेतकरी आता आहे त्या परस्थितीमध्या काढणीला सुरवात करीत आहे. सोयाबीन या पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत कायम धोका राहिलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असली तरी वावरात असलेले सोयाबीन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न राहणार आहेत.