ऊस आमच्या घामाचा … थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ऊस गाळप हंगामातील थकीत एफआरपीची‌ रक्कम मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखाना आणि युटोपीयन साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.नवीन गाळप हंगाम तोंडावर आलेला असतानाही या दोन्ही साखर कारखान्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

साखर कारखानदारांनी ऊस गाळपास आल्यानंतर १४ दिवसाच्या आत एकरकमी एफ आर पी देने कायद्याने बंधनकारक आहे . दुसरा गळीत हंगाम सुरू होत आला तरी अद्यापपर्यंत ऊस उत्पादकांना गतवर्षीचे एफआरपीचे पैसे मिळालेले नाहीत. काही कारखान्यानी कायदयाचे उल्लंघन करीत शेतकऱ्यांचे उसबिलाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या कारखानदारांवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करावी व एफ. आर. पी. ची थकीत रक्कम तात्काळ जमा करण्यास भाग पाडावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी केली.

यावेळी श्रीमंत केदार, दत्ता गणपाटील , दामोदर देशमुख, विजय खवतोडे, लक्ष्मण गायकवाड, नितीन नकाते, सोमनाथ बुरजे, प्रभू शिंदे, अर्जुन मुदगुल, सुनील मुढे, रवी गोवे, श्रीधर खांडेकर, ॲड भारत पवार, हणमंत भुसे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.