हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात असमान झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मागील काही दिवसात सोनयाबीन पिकाला चांगला भाव मिळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीन या पिकाची यंदाच्या खरिपात लागवड केली मात्र असमान पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले. सध्या सोयाबीनचा दर कमी झाल्यामुळे सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर देखील #सोयाबीन हा ट्रेंड झाला होता.
ना कुण्या पक्षासाठी तर आपल्या बापाच्या हक्कासाठी
गुरुवारी रात्री हा ट्रेंड चालवण्यात आला. यामध्ये हजारो शेतकरी पुत्रांनी सहभाग नोंदवून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ना कुण्या पक्षासाठी तर आपल्या बापाच्या हक्कासाठी ही टॅग लाईन घेऊन सुरु करण्यात आलेल्या ट्रेंडला अनेकांनी प्रतिसाद दिला होता. याबाबत ब्रम्हा चट्टे यांनी सोशल मिडीयावर अवाहन केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 पयर्यंतच्या या ट्रेंडमध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. या दरम्यान हे ट्रेंड टॅापला होता.यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी सरकारचे धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण याबाबत व्यथा मांडल्या आहेत.
सोयाबीनचा दर , बाजारात दाखल होताच 11 हजार रुपये क्विंटलचा दर होता. मात्र, हा दर काही तासांपुरताच मर्यादीत राहिला होता. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने राजकीय हेतू ठेऊन खाद्य तेलावरील आयात शुल्क हे कमी केले आहे तर दुसरीकडे सोयापेंडच्या आयातीला परवानगी ही दिलेली आहे.त्यामुळेच सोयाबीनची आवक वाढताच दर हे कमी झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा रोष अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात होता. तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त ही होत होता. पण ब्रम्हा चट्टे यांनी #सोयाबीन या माध्यमातून व्यक्त होण्याचे अवाहन केले होते. याला शेतकरी पुत्रांनी चांगला प्रतिसाद दिला होता. गुरुवारी रात्री हा ट्रेंड टॅापवर होता.
त्यामुळेच सोयाबीनची आवक वाढताच दर हे कमी झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा रोष अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात होता. तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त ही होत होता. पण ब्रम्हा चट्टे यांनी #सोयाबीन या माध्यमातून व्यक्त होण्याचे अवाहन केले होते. याला शेतकरी पुत्रांनी चांगला प्रतिसाद दिला होता. गुरुवारी रात्री हा ट्रेंड टॅापवर होता.
सोयाबीनचे दर
लातूर – 7400 ते 6700, अकोला – 4500 ते 5500, जालना- 4700 ते 5700, हिंगोली 5500 ते 6400 असे गुरुवारचे दर राहिलेले आहेत.