चांगल्या दरासाठी ; सोयाबीन विक्रीची घाई नको, पहा काय सांगतायत विश्लेषक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले जात आहे मात्र सरसकट सोयाबीनला वाढीव दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई न करता टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्याचा आवाहन बाजार विश्लेषक यांच्याकडून केलं जात आहे.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची पहिल्यांदा अवगत झाल्यानंतर मुहूर्ताच्या या शेतमालाला नऊ हजार ते दहा हजार रुपयांचा दर मिळाला अनेक शेतकऱ्यांनी या लिलावाचे व्यवहार व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यासोबत विक्री पावती चा फोटो देखील व्हायरल करण्यात आला. अनेक व्हाट्सअप ग्रुप वर देखील हे फोटो आजही व्हायरल होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अधिक आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले जात आहे. प्रक्रिया उद्योजकांकडून सरासरी दहा टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी केले जाते. सध्या नव्या सोयाबीन मध्ये दुप्पट म्हणजे 20 टक्के आर्द्रता आहे. त्या सोबतच काही भागात पाण्याने डाग आलेले सोयाबीन देखील बाजारात पोहोचत आहेत. अशा वेळी शेतकर्‍यांनी विक्रीची घाई न करता चांगला दर पदरात पाडून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली पाहिजे असे आवाहन बाजार विश्लेषक यांच्याकडून कडून केलं जात आहे.