मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान तर २२ जणांनी गमावला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एकामागून एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या मराठवाड्यामध्ये शेती पिकांचे बाधित क्षेत्र २५ लाख 98 हजार 213 हेक्‍टरवर पोहोचले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 27 व 28 सप्टेंबर या दोन दिवसात तब्बल १० लाख 56 हजार 848 हेक्‍टर क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. तर १ जून ते 28 सप्टेंबर दरम्यान जवळपास 2254 कोटी 11 लाख 75 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं वर्तवला आहे.

आधीच्या नैसर्गिक आपत्तीतून सावरत नाही व त्या नुकसानीच्या पंचनाम्याचे प्रक्रिया सुरू असतानाच दुसऱ्या नैसर्गिक आपत्तीचे आघात टप्प्याटप्प्याने मराठवाड्यावर झाले. प्राप्त माहितीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यात मिळून १ जून ते 28 सप्टेंबर दरम्यान 35 लाख 64 हजार 391 शेतकऱ्यांचे 25 लाख 98 हजार 213 हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जवळपास ४ हजार 390 किलोमीटरच्या रस्त्याचे नुकसान झाले असून 1070 पूल वाहून गेलेत. जवळपास 116 शासकीय इमारतींनाही मराठवाड्यातील नैसर्गिक जलप्रकोपाचा दणका बसलाय. 71 जिल्हा परिषदेच्या शाळांचे नुकसान झाले असून 205 तलाव फुटण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलया आहेत. महावितरणच्या 3116 ठिकाणच्या पायाभूत सुविधांचा नुकसान झाले आहे.

आतापर्यंत जवळपास २२ व्यक्तींना मराठवाड्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपला जीव गमवावा लागला आहे. 319 दुधाळ लहान-मोठी जनावरे मयत झाली असून लहान-मोठे जवळपास 74 जनावरं तसेच ७२ कोंबड्या या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलया आहेत. कच्च्या व पक्या मिळून 14 घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. जवळपास 2000 बहात्तर कच्च्या पक्क्या घरांची ही पडझड झाली आहे. मराठवाड्यात पूररेषेतील रेड लाईन वर असलेल्या गावांची संख्या 440 तर ब्ल्यू लाईन वर असलेल्या गावांची संख्या 97 आहे. जून ते 28 सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत 9 गावांना पुराने वेढलं होतं तर 104 गावांचा संपर्क तुटला होता. जवळपास 770 व्यक्ती पुरात अडकलेल्या होत्या तर 1101 व्यक्तींना पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थलांतरित करण्यात आलं होतं.