हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात मागील दोन दिवसात पावसाने काहीशी उसंत दिली होती. मात्र पुढील तीन चार तासात मराठवाड्यातील काही भागात पुन्हा एकदा मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतात शेतकरी काहीसा सावरू पाहतोय तोवर पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. स्थानिक शेतकरी आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. जायकवाडी धरणातून देखील विसर्ग सोडण्यात येत आहे.
जायकवाडी धरणातून विसर्ग सुरु
आज दि. 02/10/2021 सकाळी धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेट क्र. 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन गेट 0 फुटावरुन 1.5 फुट उंचीवर उघडण्यात येणार आहेत. अशाप्रकारे 14148 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवुन 89604 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. 10 ते 27 हे गेट 4 फुट उंचीने उघडण्यात आले आहेत. तर 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन गेट 1.5 फुट उंचीने उघडण्यात आले आहेत. सध्या परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवर तिसऱ्या क्रमांकाच्या मुदगल उच्च पातळी बंधारा ज्याची साठवण क्षमता 11 दलघमी आहे 77% एवढा पाणीसाठा असल्याने व जायकवाडी धरणामध्ये पाण्याचा विसर्ग चालू असल्याने या उच्च पातळी बंधाऱ्या मधून 70हजार 377 क्युसेकने 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता गोदापात्रात विसर्ग चालू होता.
आजही पावसाची शक्यता
दरम्यान परभणी जिल्ह्यात 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाला असून पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचे सांगण्यात आले आहेत .स्थानिक शेतकरी आता पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात औरंगाबाद, बीड, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी ३० ते ४० किलोमीटर) राहून मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुधनास निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व बाहेर पडताना काळजी घ्यावी. असे अवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के . डाखोरे यांनी दिली आहे.