शेतात जाण्यासाठी हवाय हक्काचा रस्ता ? मग कायदेशीर मार्गाने असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो शेत आणि शेतातील रास्ता यावरून अनेकदा मोठे वाद निर्मण झाल्याच्या घटना आपण पहिल्या आहेत. दोन शेतमालकांच्या शेतजमिनी जवजवळ असल्या तर तर येण्या- जाण्याला रास्ता कोण देणार ? यावरून बऱ्याचदा वाद होतो. मात्र शेतातला रास्ता कायदेशीर पद्धतीने नेमका करायचा कसा ? याबाबतची माहिती आजच्या लेखात आपण करून घेणार आहोत.

वेगवेगळ्या शेतमालकांचे शेत लागूनच असेल तेव्हा काही वेळा शेतातून रास्ता देण्यासाठी समजुतीने एकमेकांच्या सामंजस्याने मार्ग काढला जातो. पण काही वेळा असे होत नाही. मग अशावेळेला शेतकऱ्याला तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागतो. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.

अर्ज करण्याची पद्धत

–तुम्हाला तहसीलदार यांच्या नावागे अर्ज करावा लागणार आहे.
–त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करता आहे ते नमुद करायाचे आहे.
–त्या खालोखाल अर्जाचा विषय लिहायाचा आहे.
–विषयामध्ये शेतात येण्या-जाण्यासाठी जमिनिच्या बांधावरून कायमस्वरूपी मिळण्याबाबत, असा विषय नमुद करायाचा आहे.
— यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेतीच्या माहिताचा तपशील द्यायचा आहे.
–यामध्ये अर्जदाराचे नाव, गाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असायला पाहिजे.
–त्याखाली अर्जादाराला आपल्या शेतीचा तपशील द्यायचा आहे.
–यामध्ये शेती कोणत्या गटात येते तो गट क्रमांक, शेतकऱ्याकडे असलेली शेती किती आहे,शेतसारा इत्यादींचा समावेश असावा.
— अर्जदाराची शेती जर सामायिक क्षेत्रात येत असेल तर त्याच्या वाटणीला किती शेती येत आहे.
–यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनी शेजारी कोणाकोणाची शेती आहे.
— त्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता याची माहिती द्यायची आहे.
–यामध्ये अर्जदाराच्या जमिनीच्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे. त्यांची नावे आणि पत्ते देणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे. त्या जमिनचा कच्चा नकाशा
2) अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा
3) शेजारील शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
4) अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती

सर्व कागदपत्रांसह शेतकऱ्याने तहसीलदाराकडे अर्ज केला की, अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्ता जाणार आहे, अशा शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अर्जदाराला शेत रस्त्याची खरोखरच गरज आहे काय? याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून खातरजमा केली जाते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की, तहसीलदार शेत रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात. एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर तहसीलदार अर्ज स्विकारतात किंवा अर्ज फेटाळून लावतात.

तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर, शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढतात. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते. ८ फूट रूंदीचा रस्ता मंजूर केला जातो. एकावेळेस एक बैलगाडी जाईल इतक्या रूंदीचा रस्ता मंजूर केला जाते. जर तहसीलदार यांनी दिलेला आदेश शेतकऱ्यास मान्य नसेल तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येते.