हॅलो कृषी ऑनलाइन: पावसाची धास्ती आता संपली असून आता कमी तापमानाचा धोका शेतकऱ्यांना सतावतो आहे. आजपासून पुढील पाच दिवस तापमानात घाट होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने वर्तवला आहे. हे तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते असे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे उरकून घेऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम हा लिंबीवर्गीय पिकांमध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव होणार आहे त्याचीही काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
महत्वाच्या बाबी
–रब्बी हंगामाच्या अनुषंगाने या दरम्यानच्या काळात बागायती हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करुन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात केली तर या हवामानामुळे वाढ जोमात होणार आहे.
–पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया ही आवश्यक आहे.
— केवळ हरभराच नाही तर सर्वच पिकांसाठी ही बीजप्रक्रीया केल्यास पेरलेल्या बियाणला बुरशी लागणार नाही.
–त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणास पीएसबी, रायझोबियम, जिवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडरर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रीया आवश्यक आहे.
–मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम हा लिंबीवर्गीय पिकांमध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव होणार आहे त्याचीही काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
15 नोव्हेंबरपासून ऊस लागवडीस पोषक वातावरण
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र हे गतवर्षीपेक्षा वाढणार आहे. शिवाय शेत मशागतीसाठी वेळही आहे. शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपासून ऊसाच्या लागवडीस सुरवात केली तरी योग्य वेळी उगवण होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
हळदीला कंदमाशीचा प्रादुर्भाव
बदलत्या वातावरणामुळे हळदीला कंदमाशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे क्विनालफॅास 25 टक्के, 20 मिली डायमिथोएट, 30 टक्के 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय हळदीचे कंद हे मातीने झाकून ठेवणे आवश्यक आहे.
कोळी किडीवर उपाययोजना
लिंबूवर्गीय पिकांवर कोळ किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायकोफॅाल 18.5, ईसी, 2 मिली, प्रापरगाईट 20 ईसी, 1 मीली इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यता असल्यास दुसरी फवारणी ही 15 दिवसांनी करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाचे डॅा. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.
संदर्भ : टीव्ही ९