हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आंबिया बहरासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून नोंदणी अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे. या वेळी पाऊस, जादा तापमान, अति पाऊस किंवा गारपिटी पासून फळ पिकांना विमा संरक्षण मिळण्याची सुविधा या योजनेत आहे. आंबिया बहराच्या विमा योजनेत डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिकं असतील. याबाबतची माहिती राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.
महतवाच्या बाबी
— अधिसूचित क्षेत्र अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट द्यावी.
–एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठी देखील या योजनेत सहभागी घेऊ शकतात.
— मात्र त्यासाठी फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल.
–एक शेतकरी चार हेक्टर च्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळू शकतो विमा संरक्षित रकमेचे पाच टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवला जातो.
— त्यापेक्षा जास्त हप्ता असल्यास केंद्र व राज्याकडून अनुदान दिले जातो मात्र असा हप्ता 35 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्याला पाच टक्क्यांपेक्षा जादा विमा हप्ता भरावा लागणार आहे.
— कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना ऐच्छिक असेल.
–ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रात उपलब्ध आहे.
बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास (आवश्यक कागदपत्रे )
१)आधार ओळखपत्र
२) 7बारा ,8अ उतारा
३) पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र
४)फळबागेचा अक्षांश-रेखांश चिन्हांकित केलेले छायाचित्र
५) बँकेचे खाते पुस्तक
कशी कराल नोंदणी
केंद्र सरकारच्या http://pmfby.gov.in या संकेतस्थळावर भीमा नोंदणी करता येईल तसेच विविध प्रकारची ई सेवा केंद्र बँकांमार्फत देखील सहभाग नोंदवता येईल कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींशी नाव व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.