हॅलो कृषी ऑनलाईन : नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेज ची घोषणा करून हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा माजी खा राजू शेट्टी यांनी लिंगणूर येथे दिला. मिरज तालुक्यातील लिंगणूर, बेडग, खटाव येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील मिरज,तासगाव, पलूस,जत,कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील 60 ते70 हजार एकर वरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे घडकुज, दाव न्या आदीसह अन्य कारणांनी संपूर्ण द्राक्ष बगाचे 100 टक्के नुकसान झाले आहे एकरी चार ते पाच लाखाचे नुकसान झाले आहे संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा साडे ते चार हजार कोटीचा आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे ,धीर देणे आणि पाहणी करण्यासाठी शेट्टी रविवारी मिरज पूर्व भागात आले होते.
जिल्ह्यात साडेचार हजार कोटींचे नुकसान
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आदी तालुक्यातील 60 ते70 हजार एकरावरील द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकावर घडकुज. दावन्या अशा विविध प्रकारचे रोग पडल्याने द्राक्ष बगाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. द्राक्ष बागासाठी एकरी चार ते पाच लाखांचा खर्च येतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नुकसानीचा सरासरी आकडा हा चार ते साडेचार हजार कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. राजू शेट्टी यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहाणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.