हॅलो कृषी ऑनलाईन : देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेती प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. ते गुजरात मधील आनंद मधील नैसर्गिक शेती संमेलनात बोलत होते. तसेच देशातील २ राज्यात हे काम सुरु असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना शहा म्हणाले , देशात कृषी हा मुख्य व्यवसाय आहे. कोरोनाच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही याच क्षेत्रामुळे देशाचा जेडीपी टिकून राहिला होता. शेती हा अर्थव्यवस्थेतला महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्याच अनुशंगाने केंद्र सरकार योजना राबवत आहेत. योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा याकरिता अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. सरकारने योजनांध्ये तत्परता आणि प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ मिळावा हाच केंद्र सरकारचा उद्देश असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे.
प्रयोगशाळेची उद्दिष्ट्ये
–शेतीचे आरोग्य आणि उत्पादनवाढीसाठी कोणत्या घटकांचा वापर करणे आवश्यक आहे त्याची अचूक माहिती ही प्रयोगशाळेच्या माध्यमातूनच होणार आहे. –नैसर्गिक शेती शास्त्रोक्त पध्दतीने करण्यासाठी प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका राहणार आहे.
–त्यामुळे देशभर नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा ह्या उभारल्या जाणार आहेत.
–सहकार मंत्रालयाच्या वतीने 2 राज्यांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारण्याचे कामही सुरु झाले आहे.
–यामध्ये माती परीक्षण, पाणी नमुने तपासणी, उत्पादित पिकांचे मुल्यमापन आदी प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत.