नागठाणेत महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : साताऱ्यात महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचनेची नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज नागठाणे ते गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱयांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

सुमारे पाच तास मोर्चेकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सुमारे 100हुन अधिक मोर्चेकऱ्यांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे..

महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना चुकीची विजबिले देऊन ती सक्तीने वसूल केली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता शेतीपंपाची कनेक्शन महावितरण जबरदस्तीने कट करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शिवारातील असणारी उभी पिके पाण्याभावी वाळून गेली आहेत.वीज वितरण कंपनीकडून शेतकऱयांची पठाणी पद्धतीने वसुली सुरू आहे.यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने परीसरतील शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा गणेशवाडी येथील कार्यालयावर काढण्यात आला होता. नागठाणे येथील स्वागत कमानीपासून या मोर्चाची सुरवात झाली.परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात या मोर्चात सहभागी झाला होता.