उत्पादन घटूनही खर्चात वाढ, रब्बीतील मुख्य पिकालाचे रोगाने घेरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बीत हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक पीक म्हणजे ज्वारी. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ज्वारी हेच मुख्य पीक आहे. मराठवाड्यातील ज्वारीची खासियत तिच्या स्वादामुळे होते. तर कडब्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो. सोलापूर ,लातूर, उस्मानाबादेत ज्वारीचा पेरा मोठा असतो. ज्वारीचे पीक सध्या पोटऱ्यात आले आहे. मात्र ज्वारीवर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो आहे. त्यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. मात्र पिकाची वाढ झाल्यामुळे फवारणी करणेही मुश्किल झाले आहे.

याबाबत शेतकरी की , पेरणी झाली की काढणी पर्यत केवळ दोन पाणी दिले की उत्पादनात वाढ असे भरवश्याचे पीक असलेल्या ज्वारीला यंदा प्रथमच फवारणी करावी लागत आहे. ज्वारीला कणसे लागली आहेत. अशा अवस्थेत आता चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कडब्याचेही नुकसान होत आहे तर उत्पादनावरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे मुख्य पीक असलेल्या ज्वारीतूनही अपेक्षित उत्पादन मिळते की नाही अशी अवस्था झाली आहे. अधिकचा खर्च करुनही शेतकरी हे चिंतेमध्ये आहेत.

चिकटा व्यवस्थापन

रब्बी ज्वारी पिकावरील चिकटा व्यवस्थापनासाठी कार्बेंडाझीम 10 ग्रॅम प्रति 10 ‍लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. असा सल्ला कृषी तज्ञांनी दिली आहे.